त्या १५५ पोलीस अधिकार्‍यांची अखेर घरवापसी

ते गेले आणि दोन महिन्यांत पुन्हा आले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्यामुळे केंद्रीय निवडणुक आयोगाने राज्य सरकारचे चांगलेच कान उपटले होते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यासह सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या मुंबईबाहेर बदल्या झाल्या आहे. बदल्या झालेल्या १५५ पोलीस अधिकार्‍यांची अखेर घरवापसी झाली आहे. बुधवारी गृहविभागाने एक अध्यादेश काढून या पोलीस अधिकार्‍यांची पुन्हा मुंबई शहरात बदली केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात आयोगाने राज्य सरकारला पोलीस दलातील अधिकाऱ्याच्या बदल्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना तत्कालीन शिंदे सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आयोगाने राज्य सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच मनमानी कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्ती केली होती. ३ वर्ष पेक्षा अधिक सेवा असणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदल्या कराव्यात असे सांगितले होते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात ऐन निवडणुकी दरम्यान मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्याच्या तात्काळ बदल्या केल्या होत्या.
मुंबईत एकाच वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, पोलीस उपायुक्त याच्या बदल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. ज्या अधिकाऱ्यांना मुंबईतील गुन्हेगाराची कुंडली माहिती होती, स्थानिक खबऱ्यांचे नेटवर्क होते, अशाना निवडणुकीच्या काळात बदली केल्याने पोलीस दलात नाराजी होती. त्यातच काही पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचे शिक्षण, तर काही अधिकाऱ्याच्या मुलाची लग्न होणार आहेत. त्याच दरम्यान अधिकाऱ्यांना मुंबई बाहेर पोस्टिंग दिल्याने काही अधिकारी हे मॅट मध्ये देखील गेले होते. विशेष म्हणजे काही अधिकारी हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काही महिन्यापूर्वीच रुजू झाले, त्याची देखील बदली केली होती. तर काही पोलीस अधिकारी हे राजकीय वजन वापरून प्रादेशिक विभाग (रिझन ) मध्येच पोलीस ठाण्यात बदली करत होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर आता गृहविभागाने मुंबईबाहेर बदली झालेल्या पोलीस अधिकार्‍यांची पुन्हा मुंबई शहरात बदली केली आहे. बुधवारी एका अध्यादेशाद्वारे १५५ पोलीस निरीक्षकांना मुंबईत पुन्हा बदली दाखविण्यात आले आहे. अवघ्या दोन महिन्यांत घरवापसी झाल्याने या अधिकार्‍यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी लवकरच मुंबई पोलीस दलात रुजू होणार आहे. नंतर त्यांना त्यांची पोस्टिंग दाखविण्यात येणार आहे. ज्या पोलीस अधिकार्‍यांची मुंबईत बदली दाखविण्यात आली आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे.

पुण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत दादू जगदाळे, महेश पंढरीनाथ गुरव,
अमरावतीचे पोलीस निरीक्षक योगेश मारुती चव्हाण,
गोंदियाचे पोलीस निरीक्षक भागवत रामा गरंडे, अशोक सुरगौडा खोत, धनंजय पंढरीनाथ सोनावणे,
भंडार्‍याचे पोलीस निरीक्षक राजेश रुद्रमनी नंदीमठ, राजेश प्रभाकर केवळे,
गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रामपियारे गोपीनाथ राजभर, ज्ञानेश्‍वर रामनाथ गणोरे, सदानंद जानबा राणे, किशोर सखाराम आव्हाळे, विनीत दिलीप कदम,
ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंब व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, प्रविण दत्ताराम राणे, रविंद्र परमेश्‍वर अडाणे, संजय सदाशिव मराठे, सुनिल दत्ताराम जाधव, मनिष अजित शिर्के, गणेश बाळासाहेब पवार, जगदीशश कल्लाप्पा माने, इरफान इब्राहिम शेख, ऋता शशांक नेमळेकर, विनोद नरहरी गावकर,
राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक संजय भिकाजी निकम, विशाल सुभाष राजे,
खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक फरीदखान हुरखान खान, चंद्रकांत बाळासाहेब कांबळे,
चंदूपरचे पोलीस निरीक्षक गबाजी शंकर चिमटे, मदन विष्णू पाटील,
मुंबई लोहमार्गचे पोलीस निरीक्षक राजीव शिवाजीराव चव्हाण, संतोष जगन्नाथ माने, राजेश रामचंद्र शिंदे, अनघा अशोक सातवसे, संजय थानसिंग चव्हाण
मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस निरीक्षक प्रमोद बळीराम तावडे, सुवर्णा नितीन हुलवान, धनंजय मदनराव शिंदे, अमीत सिद्राम ताड, धनंजय भगवंत कावडे,
नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक संजय सुभाष परदेशी,
विशेष सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक सिमा मधुकर ढाणे, प्रविण शंकर पाटील,
नागपूरचे पोलीस निरीक्षक मोहन गणपती पाटील, संजय तातोबा काटे, महेशकुमार नवलसिंग ठाकूर, सतीश दत्तात्रय गायकवाड, अशोक तात्याबा पारधी, विनोद दिनकर गायकवाड, इक्बाल मोहम्मद शिकलगार, वैशाल खुशालराव चव्हाण, गोपाळ बाबूराव भोसले, पुष्पक बाळकृष्ण इंगळे, सुशीलकुमार भिमराव गायकवाड, शिवाजी रोहिदास जाधव, विक्रम विलास चव्हाण, फिरोजखान अन्वर पठाण, विजय बाबासाहेब दंडवते, संजय नामदेव ढोन्नर, गणेश गंगाराम सावर्डेकर, विजय बाळकृष्ण मांडये, आदिनाथ आनंदाग गावडे, सतीश सखाराम कावणकर, सुशांत गणपत सावंत, अनिल काशिनाथ जायकर,
वर्धाचे पोलीस निरीक्षक अनंत भिमसेन शिंदे, रविराज दादासाहेब जाधव, रोहित चंद्रकांत खोत, विक्रांत शंकर शिरसट,
सांगलीचे पोलीस निरीक्षक रविंद्र आबासाहेब मोहिते, सलीम युसूफ खान
नानवीजचे पोलीस निरीक्षक मिलिंद दशरथ नागपुरे, अनंत लक्ष्मण रावराणे, कोंडीबापू मानसिंग गायकवाड, विजयकुमार रामचंद्र अंबरगे, सुरेश बाबू चोरट, प्रदीप मोहन पगारे, अतुल शांताराम आव्हाड, प्राजक्ता प्रल्हाद पवार,
कोल्हापूरच्या पोलीस निरीक्षक प्रमिला पोपटराव दौडकर,
रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे
बुलढाणाचे पोलीस निरीक्षक राजू भागूजी बिडकर,
अकोल्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र महादेव काटकर, चिमाजी जगन्नाथ आढाव, संदीप बाबाजी विश्‍वासराव, अरुण बबन पोखरकर, अरविंद प्रल्हा चंदनशिवे, प्रमोद नामदेव भोवते, नितीन शंकर तडाखे, पंढरीनाथ झिपरु पाटील,
लातूरचे पोलीस निरीक्षक उमेश सोपान मचिंदर, संतोष नारायण धनवटे, अजय रामदास जोशी,
नांदेडचे पोलीस निरीक्षक मंजुषा नंदकुमार परब, सागर जगन्नाथ शिवलकर, शैलेशकुमार लक्ष्मीनारायण अंचलवार,
बीडचे पोलीस निरीक्षक केशवकुमार मारुती कसार,
हिंगोलीचे पोलीस निरीक्षक जयवंत पांडुरंग सपकाळ,
परभणीचे पोलीस निरीक्षक दिपक कृष्णा दळवी,
जालनाचे पोलीस निरीक्षक मनिष सुरेश श्रीधनकर, विलास वामनराव दातीर, शशिकांत वामनराव पवार, प्रितम शाम बाणावली, निलिमा सचिन कुलकर्णी, योगेश रामचंद्र शिंदे,
नाशिकचे पोलीस निरीक्षक अरुण महादेव सावंत, अनंत सिताराम साळुंखे, उदय सखाराम कदम, रमेश यशवंत खिल्लारे, बापूसाहेब तुकाराम बागल,
जळगावचे पोलीस निरीक्षक गौंडूराम वकिलाजी बांगर,
पालघरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय विष्णू ठाकूर
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दुश्यंत अप्पाजी चव्हाण, सतीश सोपान पवार, दिपशिखा दिपक वारे, शिवाजी कोंडीबा पावडे,
सोलापूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय भिकाजी कोंकरे, दिपक विठ्ठल शिंदे, संतोष शंकर कोकरे, लिलाधर पांडुरंग पाटील, नितीन रविंद्र महाडिक, सुदर्शन भास्कर चव्हाण, अनिल पांडुरंग पाटील, सचिन बळीराम शिंदे, दिपक नामदेव जाधव, सुधाकर कृष्णा शितप,
एटीएसचे दत्तात्रय विठ्ठल पाटील, संतोष शिवदास ढेमरे
मरोळ प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, रविंद्र वासुदव कुडपकर, महेंद्र वामन शिंदे, सचिन राजाराम गवस, सजय सुदाम खेडकर
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक अमोल पांडुरंग टमके,
महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार श्रीराम कोकाटे, मनोज लक्ष्मण चाळके,
पिंपरी-चिंचवडचे पोलीस निरीक्षक ज्योती घनश्याम बागुल-भोपळे, श्रीनिवास संतराम चेवले
नागरी हक्क संरक्षणचे पोलीस निरीक्षक जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर,
यवतमाळचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नारायण देखमुख, राजेंद्र महादेव मचिंदर
धुळ्याचे पोलीस निरीक्षक विलास रामदास भोसले, सोमेश्‍वर तुकाराम खाटपे, सुनिल महादेव यादव, रागिनी रामचंद्र वाघमारे, संजय आत्माराम पवार,
रायगडचे मधूसुदन गणेश नाईक

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page