राज्यातील ४३ पोलिसांना राष्ट्रपदी पदक जाहीर

चौघांना विशिष्ठ सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्ता सेवेसाठी पुरस्कार जाहीर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ जानेवारी २०२५
मुंबई, – प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलीस दलातील ४३ हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपदी पदक जाहीर करण्यात आले होते. त्यात चार पोलीस अधिकार्‍यांना विशिष्ठ सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहेत. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्राला एकही शौर्य पदक मिळाले नाही.

प्रजाकसत्ताक दिनानिमित्त राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा ४३ जणांना राष्ट्रपदी पदक शनिवारी जाहीर करण्यात आले. विशिष्ठ सेवेसाठी जाहीर झालेल्या राष्ट्रपदी पदकामध्ये अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी आणि कमांडंट रामचंद्र बाबू केंडे यांचा समावेश आहे. ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात पोलीस पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस महानिरीक्षक आरती सिंह, पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे, पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, पोलीस उपअधिक्षक सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस अयुक्त ममता लॉरेन्स डिसुझा, धर्मपाल बनसोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, राजेंद्र कोते, सुरेश मनोरे, पोलीस उपअधिक्षक रोशन यादव अनिल लाड, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण डुंबरे, पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख, श्रीकांत तावडे, महादेव काळे, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र वाघ, रविंद्र वानखेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव मस्के, संजय जोशी, दत्तू गायकवाड, नंदकिशोर बोरोले, आनंद जंगम, सुनिता पवार, जितेंद्र म्हात्रे, प्रफुल्ल सुर्वे, राजेंद्र काळे, सलीम शेख, तुकाराम आव्हाळे, सय्यद इक्बाल हुसैन सय्यद माथार हुसेन, रामराव नागे, पोलीस हवालदार रामभाऊ खंडागळे, संजय चौबे, विजय जाधव, दिलीप राठोड, आणि आयुब खान मुल्ला यांचा समावेश आहे. यंदा महाराष्ट्राला एकही शौर्य पदक मिळाले नाही. केंद्रीय गृहविभागाने ९५ शौर्यपदकाची घोषणा केली आहे. त्यात ७८ पोलीस अधिकारी आणि सतरा पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक २८ शौर्य पदक जम्मू-काश्मीरला मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page