५९ पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना राष्ट्रपती पदक जाहीर
तिघांना उत्कृष्ठ सेवा, सतरा शौर्य तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पदक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील ५९ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना उत्कृष्ठ सेवेसह शौर्य आणि गुणवत्तापूर्वक राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले आहे. त्यात तीन अधिकार्यांचा उत्कृष्ट सेवेसाठी, सतरा पोलिसांना शौर्य पदक आणि ३९ पोलिसांचा गुणवत्तापूर्वक सेवेचा समावेश आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्यासह आयपीएस अधिकारी राजेंद्र डहाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील १ हजार ३७ पोलिसांना शौर्य, सेवा पदक जाहीर केले आहे. त्यात महाराष्ट राज्यातील ५९ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट सेवेसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव रामछबीला प्रसाद, पोलीस संचालक राजेंद्र बाळाजीराव डहाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश रघुवीर गोवेकर यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. शौर्य पदकासाठी सतरा पोलीस पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी करणार्या आयपीएस अधिकारी आयपीएस अधिकारी व अतिरिक्त उपअधिक्षक अनुज तारे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल शंकर सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक दिपक रंभाजी आवटेे, दिवंगत पोलीस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने, पोलीस हवालदार नागेश बोंड्यालू मदारबोईना, शकील युसूफ शेख, विश्वनाथ समयय पेंडम, विवेक मानकू नरोटे, मोरेश्वर नामदेव पोटावी, कैलास चुंगा कुळमेथे, कोटलाबोटू कोरामी, कोरके सन्नी वेलाडी, महादेव विष्णू वानखडे, पोलीसस उपनिरीक्षक विजय दादासो सपकाळ, मुख्य पोलीस हवालदार महेश बोरु मिच्छा पोलीस हवालदार समयया लिंगय्या आसाम यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्व सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये ३९ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यात मिरा-भाईंदर-वसई-विरारचे पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय तुळशीराम शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप गजानन दिवाण, पोलीस उपअधिक्षक शिवाजी ज्ञानदेव फडतरे, संजय मारुती खांदे, वितीन जयंत चौधरी, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय मोहन हातिस्कर, पोलीस उपअधिक्षक महेश मोहनराव तराडे, पोलीस निरीक्षक राजेश रमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक गजानन कृष्णराव तांदुळकर, राजेंद्र तुकाराम पाटील, संजय साहो राणे, गोविंद दादू शेवाळे, मधफकर पोछा नैताम, अशोक बापू होनमाने, शशिकांत शंकर तटकरे, अक्षयवारनाथ जोखुराम शुक्ला, शिवाजी गोविंद जुंदरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोतीराम देशमुख, दत्तू रामनाथ खुळे, पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल लयाप्पा हांडे, देवीदास श्रावण वाघ, प्रकाश शंकर वाघमारे, मोनिका सॅम्युअल थॉमस, पोलीस हवालदार बंडू बाबूराव ठाकरे, गणेश मानाजी भामरे, अरुण निवृत्ती खैरे, दिपक नारायण टिल्लू, राजेश तुकारामजी पैदलवार, सहाय्यक कमांडंट श्रीकृष्ण गंगाराम हिरपूरकर, पोलीस निरीक्षक राजू संपत सुर्वे, संजीव दत्तात्रय धुमाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल उत्तम काळे, मोहन रामचंद्र निखारे, द्वारकादास महादेवराव भांगे, पोलीस उपनिरीक्षक अमीतकुमार माताप्रसाद पांडे यांचा समावेश आहे.