मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – पुण्यातील आयसिस स्लीपर मॉड्यूलप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. याच गुन्ह्यांतील मोस्ट वॉण्टेड आरोपी रिझवान अली ऊर्फ आबू सलमा ऊर्फ मोला याला अटक करण्यात आली असून त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे. रिझवान याला पाहिजे आरोपी घोषित केल्यानंतर त्याच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला तीन लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. त्याच्या अटकेने आयसिस स्लीपर मॉड्यूलमागील अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आयसिसने भारताविरोधी कारवायासाठी एका स्लीपर मॉड्यूलची नियुक्ती केली होती. या मॉड्युलवर मुंबईसह देशभरात मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याची जबाबदारी सोपविण्यात आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेतंर्गत आतापर्यंत दहाजणांना अटक करण्यात आलीद होती. त्यात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी अब्दुल कादिर पठाण, सिमब नसीरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अफिक नाचन, शाहनवाज आलम, अब्दुल्ला फैय्याज शेख आणि तल्हा खान यांचा समावेश होता. त्यांच्याविरुद्ध युए, स्फोटक पदार्थ, शस्त्रास्त्र कायदा आणि भादवीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत दहाही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यांच्या चौकशीत रिझवान अली याचे नाव समोर आले होते. तोच या कटातील मुख्य सूत्रधार होता. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्याच्या अटकेसाठी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. तो प्रत्येक वेळेस या अधिकार्यांना चकमा देत होता. त्याच्याविरुद्ध विशेष एनआयए कोर्टाने स्थायी अजामिनपात्र वॉरंट जारी करताना त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अनेक महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रिझवान अलीला अखेर या अधिकार्यांनी अटक केली.
रिझवान पुणे आयसिस स्लीपर मॉड्युलचा मुख्य आरोपी होता. त्याच्यावर विदेशी दहशतवादी संघटना, इस्मालिक स्टेट ऑफ इराक आणि सिरियाच्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. देशभरात घातपाती कारवायासाठी त्याने विविध शहरांची रेकी केली होती. त्यासाठी विशेष दहशतवादी प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेने राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश मिळाल्याचे बोलले जाते.