बोगस क्यूआर कोड लावून फसवणुक करणार्या ठगाला अटक
अनेक छोटा व्यावसायिकाच्या दुकानातील क्यूआर कोड बदलले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – दुकानाबाहेर छोट्या व्यावसायिकाने लावलेले क्यूआर काढून स्वतचे क्यूआर लावून फसवणुक करणार्या सराईत ठगाला खार पोलिसांनी अटक केली. शिवओम चंद्रभान दुबे असे या 22 वर्षीय ठगाचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याचे तीन वेगवेगळ्या बँकेत बचत खाते असून या खात्याचे त्याने क्यूआर कोड लावले होते. गेल्या दोन महिन्यांत त्याच्या बँक खात्यात अनेकांनी क्यूआर स्कॅन करुन पैसे ट्रान्स्फर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदाराचा खार परिसरात पानाची एक टपरी आहे. या टपरीवरुन अनेक ग्राहक येत होते. काहीजण कॅश तर काहीजण क्यूआर स्कॅन करुन पेमेंट करत होते. त्यामुळे त्याने त्याच्या टपरीबाहेर स्वतचा एक क्यूआर कोड लावला होता. मात्र काही दिवसांपासून त्याच्या बँक खात्यात क्यूआर स्कॅन करुन पेमेंट केल्यानंतर पैसे ट्रान्स्फर होत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने टपरीबाहेरील क्यूआर कोड स्कॅन केला होता. यावेळी त्यात शिवम दुबे या व्यक्तीचे नाव आले होते. त्याच्यासह परिसरातील अनेक छोटा व्यावसायिकाच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने खार पोलिसांना हा प्रकार सांगून शिवम दुबे या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ं
या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक वैभव काटकर, मरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे, पोलीस हवालदार नारायणकर, पाटील, महिला पोलीस शिपाई मोठे, पोलीस शिपाई स्वप्नील काकडे यांनी तपास सुरु केला होता. तपासात क्यूआर स्कॅन केल्यानंतर ही रक्कम शिवम दुबे या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते.
1 जानेवारी ते 16 जुलै 2025 या कालावधीत त्याच्या तीन वेगवेगळ्या बँकेचे स्टेटमेट मिळविण्यात आले होते. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होतहोती. त्यानेच स्वतचा क्यूआर कोड काढून तिथे असलेले क्यूआर कोट काढून टाकले होते. त्यानंतर त्याच्या मोबाईलच्या सीडीआर काढण्यात आले होते. यावेळी तो गोरेगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक भिमराव धापटे, पोलीस हवालदार नारायणकर यांनी गोरेगाव येथील चिंतामणी, अवैन्यू इमारतीजवळील परिसरातून शिवओम दुबे याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चौकशीत तो उत्तरप्रदेशच्या कन्नौजख, बस्ता-भखरा गावचा रहिवाशी आहे. सध्या तो कुलाबा येथील मच्छिमारनगरात राहतो. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.