शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची प्रॉपटी ईडीकडून जप्त
प्रॉपटीमध्ये निवासी सदनिका, बंगला व शेअरचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा उद्योगपती पती रिपू सुदान कुंद्रा ऊर्फ राज कुंद्रा याला गुरुवारी ईडीने चांगलाच दणका दिला. ईडीकडून सुरु केलेल्या एका प्रकरणात राज कुंद्रा याचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याची सुमारे ९७ लाख रुपयांची प्रॉपटी तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. या प्रॉपटीमध्ये शिल्पाची निवासी सदनिका, पुण्यातील आलिशान बंगल्यासह विविध इक्विटी शेअरचा समावेश आहे. जप्तीची ही कारवाई तात्पुरती स्वरुपाची असली तरी पीएमएलए कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अजय भारद्वाज आणि अमित भारद्वाज या पुण्याच्या बंधूंनी आभासी चलन बिटकॉईनच्या गुंतवणुकीबाबत मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनारच्या माध्यमातून अनेकांना बीटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना चांगला परवाता देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ही स्किम चांगली वाटल्याने त्यात आठ हजार गुंतवणुकदरांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. काही महिन्यांत बिटकॉईनमध्ये सहा हजार सहाशे सहा कोटीची गुंतवणुक झाली होती. मात्र दिलेल्या मुदतीत गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला नव्हता. त्यामुळे या सर्व गुंतवणूकदारांची फसवणुक झाली होती. बिटकॉईनची रक्कम खाणकामासाठी घेण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी तिथे गुंतवणुक न करता विदेशात विविध ठिकाणी गुंतवून ही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारद्वाज बंधूसह इतर आरोपींविरुद्ध पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला होता.
एप्रिल २०१८ रोजी पुणे पोलिसांनी अमीत, विवेक भारद्वाज या दोघांना अटक केली होती. त्यानंतर सिम्पी भारद्वाज, नितीन गौर आणि निखिल महाजन यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर अजय आणि महेंद्र पळून गेले होते. त्यांना या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. पुण्यानंतर दिल्लीसह इतर पंधरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. पुणे आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ईडीने त्याची स्वतंत्रपणे चौकशी सुरु केली होती. या चौकशीत या योजनेत कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संबंधित सर्व आरोपीविरुद्ध पीएमएलए कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. चौकशीदरम्यान राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले होते. या समन्सनंतर राज कुंद्रा हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता. यावेळी त्याची ईडी अधिकार्यांनी कसून चौकशी केली होती. याच चौकशीत राज कुंद्राचा या संपूर्ण प्रकरणात सहभाग उघडकीस आला होता. त्याने युक्रेनमध्ये बीटकॉईन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉईन पॉन्झी घोटाळ्याचा मुख्य आरोपी अमीत भारद्वाज याच्याकडून २८५ बिटकॉईन घेतल्याचे निष्पन्न झाले होते. ते बिटकॉईन गुंतवणुकदाराकडून फसवणुक करुन घेतलेल्या पैशांतून घेण्यात आले होते. मात्र त्यांच्यातील हा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यामुळे ते बिटकॉईन कुंद्राच्या ताब्यात होते. त्याची किंमत दिडशे कोटीहून अधिक होती. त्यामुळे राज कुंद्राची ९७ लाख ७९ लाख रुपयांची प्रॉपटी ईडीकडून तात्पुरती जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने इतर आरोपींची ५९ कोटीची प्रॉपटी जप्त केली होती.
राज कुंद्रावर ही कारवाई सुरु असताना त्याच्यासह अकराजणांना जुलै २०२१ रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्यावर अश्लील चित्रपट बनविणे आणि संबंधित चित्रपट खाजगी सोशल साईटवर प्रदर्शित करुन कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दोन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर २०२१ रोजी त्याला विशेष न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. नोव्हेंबर २०२३ रोजी राज कुंद्राने त्याच्या जेलमधील जीवनावरील आधारीत अंडरट्रायल ६९ ऊर्फ युटी ६९ नावाचा एक चित्रपटाची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याने स्वत भूमिका साकारली होती.