भारत विकास परिषदेकडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
विलेपार्ले येथील कार्यक्रमांत ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – भारत विकास परिषद, तरुण मित्र मंडळ आणि उत्कर्ष मंडळातर्फे विलेपार्ले येथील शिबीर उत्कर्ष मंडळ हॉलमध्ये रविवारी एका भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला अनेकांनी भरुभरुन प्रतिसाद दिला तसेच दिवसभरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी केले होते. त्यांनी आतापर्यंत २७ वेळा रक्तदान केले आहे.
भारत विकास परिषद ही अराजकीय सामाजिक संस्था आहे. ही संस्था संपर्क सेवा संस्कार सहयोग आणि समर्पण या पंचतत्त्वावर आधारित आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन सन १९६१ सालापासून कार्यरत आहे. या संस्थेच्या संपूर्ण भारतामध्ये १६०० पेक्षा जास्त शाखा आहेत त्यापैकी विलेपार्ला ही एक शाखा आहे.
भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेतर्फे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा , तरुण मित्र मंडळ आणि उत्कर्ष मंडळ विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ०८:०० ते सायंकाळी ०४:०० यादरम्यान रक्तदान शिबिर उत्कर्ष मंडळ हॉल विलेपार्ले पूर्व मुंबई या ठिकाणी आयोजित केले होता. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये भूतपूर्व सहायक पोलीस आयुक्त आणि भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी देखील रक्तदान केले. त्यांनी आत्तापर्यंत २७ वेळा रक्तदान केलेले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात याकरिता सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री शंकर महादेवन श्री सुदेश भोसले, कलाकार श्री प्रदीप वेलणकर आणि मयूरी गोडबोले यांनी रक्तदान आव्हानाचे व्हिडिओ जारी केले होते.