चेक बाऊन्सप्रकरणी राम गोपाल वर्माविरोधात एनबीडल्ब्यू जारी

शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – चेक बाऊंस प्रकरणी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्या विरोधात सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. चेक बाउन्स प्रकरणी तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
२०१८ मध्ये एका कंपनीने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा विरोधात चेक बाउन्स ची तक्रार दाखल केली होती. त्या कंपनीच्या वकिलांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. कंपनी अनेक वर्ष हार्ड डिस्क पुरवण्याचा व्यवसाय करत आहे. फेब्रुवारी ते मार्च २०१८ या काळात कंपनीने काही हार्ड डिस्क दिल्या होत्या. ज्याच्या आधारे २ लाख ३८ हजार २०० रुपयाच्या पावत्या जमा केल्या होत्या. त्या पावत्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या आहेत. तसेच १ जून २०१८ मध्ये तक्रारदार याना जो चेक दिला होता, तो अपुऱ्या निधीमुळे बाउन्स झाला होता. ही बाब कंपनीने वर्मा याच्या लक्षात आणून दिली होती. तेव्हा त्याच रक्कमेचा दुसरा धनादेश देखील जारी करण्यात आला होता. जो ड्रॉवर पेमेंट थांबल्यामुळे बाउन्स झाला होता.
२१ जानेवारी ला अंधेरीच्या न्यायदंडाधिकारी यांनी वर्मा याना एनआय ऍक्ट नुसार दोषी ठरवले. न्यायालयाने वर्मा याना तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि तीन महिन्यात तक्रारदार याना ३ लाख ७२ हजार २१९ रुपये भरण्याचे आदेश दिले. त्यावर वर्मा याने सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात अपील दाखल करून शिक्षेस स्थगिती देण्याची विनंती केली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी ४ मार्च रोजी त्याची याचिका फेटाळून लावली. वर्मा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला. जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली तेव्हा वर्मा हे न्यायालयात हजर नव्हते. शिक्षेला स्थगिती देण्याची त्याची याचिका फेटाळून लावली. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याना जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page