लग्नाच्या आमिषाने लैगिंक अत्याचार करणारा प्रियकर गजाआड
प्रियकराकडून मुस्लिम धर्माच्या जीवनशैली लादण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका 25 वर्षांच्या तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी प्रियकराला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. मोईनुद्दीन असे या तरुणाचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याच्या मित्राला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. अटकेनंतर आरोपीला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने तक्रारदार तरुणीला रुढीवादी मुस्लिम धर्माच्या जीवनशैली लादण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तसा आरोप पिडीत मुलीच्या वकिल पित्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
64 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहतात. 25 वर्षांची पिडीत ही त्यांची मुलगी आहे. सात वर्षापूर्वी तिची त्याच परिसरात राहणार्या मोईनुद्दीन या तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. तिने त्याला होकार दिला होता. या दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. लग्नाच्या आमिषाने त्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिथेच तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले होते. जून 2018 ते जून 2025 या कालावधीत त्याने तिचा अनेकदा मानसिक व शारीरिक शोषण केला होता. त्यामुळे तिने त्याच्यापासून फारकत घेतली होती. तरीही तो तिचा सोशल मिडीयावरुन पाठलाग करुन मानसिक शोषण करत होता.
तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिला धमकी दिली होती. तिच्यावर मुस्लिम धर्माच्या जीवनशैली लादण्याचा प्रयत्न केला होता. तिने तसे न केल्यास तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याचा कराटे कोच मित्र हरिओमने तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिची समजूत काढून तिला पोलिसांत तक्रार न करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार अलीकडेच पिडीत मुलीकडून तिच्या वकिल वडिलांना समजला होता.
ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी या दोघांविरुद्ध मानखुर्द पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत मोईमुद्दीन आणि त्याचा मित्र हरिओम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकर मोइनउद्दीन याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या मित्राला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.