लैगिंक अत्याचाराचे अश्लील व्हिडीओ काढून महिलेला धमकी
खंडणी स्वरुपात तेरा लाखांचे कॅश-दागिने घेणार्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मे 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचाराचे अश्लील व्हिडीओ पतीसह नातेवाईकांना व्हायरल करण्याची धमकी देऊन एका विवाहीत महिलेला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे तिच्याच मित्राने खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या मित्राने तिच्याकडून खंडणी स्वरुपात आतापर्यंत तेरा लाखांची कॅश आणि सोन्याचे दागिने घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकणी आरोपी मित्र हिमांशूकुमार संतेद्रनाथ सिंग याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणे, लैगिंक अत्याचारासह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हिमांशूकुमार हा बिहारच्या खगरीया, चौथमच्या लालूपरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
38 वर्षांची पिडीत महिला ही एका खाजगी कंपनीत कामाला असून तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. तीन वर्षापूर्वी तिची हिमांशूकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. पिडीत महिला विवाहीत असल्याने तो नेहमी तिच्या पतीविषयी तिच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. द्वेष निर्माण करताना त्याने तिच्याशी जवळीक निर्माण झाले होते. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यावेळी तिचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्या नकळत तिचे मोबाईलवरुन अश्लील व्हिडीओ बनविले होते. लॅपटॉप आणि स्पाय कॅमेराद्वारे तिचे काही व्हिडीओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे सहा ते सात लाखांच्या खंडणीची मागणी करु लागला. तिने त्याला पैसे दिले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ तिच्या पतीसह नातेवाईकांना व्हायरल करण्याची भीती दाखवत होता. तिचे व्हिडीओ दाखवून तो तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत होता.
याच दरम्यान त्याने तिच्याकडून सव्वासहा लाख रुपये त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. तिच्या घरातून तिचे पावणेसात लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. हिमांशूकुमारकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेल आणि पैशांच्या धमकीला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसांपूर्वीच तिने घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून हिमांशूकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी 64 (2), (एम), 305, 308 (2), 352, 351 (2) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.