लैगिंक अत्याचार करुन महिलेला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी

तिन्ही आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – गुंगीचे औषध देऊन एका 37 वर्षांच्या मासेविक्री करणार्‍या महिलेवर तिच्याच परिचित तीन व्यक्तींनी लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनविले, ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत या तिघांनी तिला ब्लॅकमेल करुन पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी कुरार पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पिडीत महिला ही मालाड येथे राहत असून ती मासे विक्री करते. झाकीर, अजीत आणि सौदागर हे तिच्या परिचित आहेत. ते तिघेही अनेकदा तिच्या घरी येत होते. 20 नोव्हेंबर 2025 ते 26 फेबुवारी 2026 या कालावधीत या तिघांनी तिच्या घरी तिला गुंगीचे औषध दिले होते. बेशुद्ध झाल्यानंतर त्यांनी तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते. इतकेच नव्हे तर तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती.

तिची आणखीन बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी तिला तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तिने पाच लाख रुपये दिले नाहीतर तिचे सर्व अश्लील फोटोसह व्हिडीओ पुन्हा सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने त्यांना पाच लाख रुपये दिले होते. तरीही ते तिघेही तिला सतत ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देत होते. त्यांच्याकडून येणार्‍या धमक्यांना ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

गुरुवारी तिने घडलेला प्रकार कुरार पोलिसांना सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी देणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page