मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – सात वर्षांची असताना घरात कोणीही नसताना वडिलांच्या मावशीच्या मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप एका २३ वर्षांच्या तरुणीने भायखळा पोलिसाकडे केली आहे. या तक्रारीनंतर सोळा वर्षांनंतर आरोपी नातेवाईकाविरुद्ध भायखळा पोलिसांनी लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर पिडीत मुलीच्या आई-वडिलांना नुकसान पोहचण्याची आरोपीने धमकी दिली होती. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चौकशीनंतर संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सागितले.
२३ वर्षांची पिडीत मुलगी माझगाव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. आरोपी हा तिच्या वडिलांच्या मावशीचा मुलगा आहे. २००५ ते २००९ या कालावधीत तो त्यांच्याच घरी राहत होता. त्यावेळेस ती सात वर्षांची होती. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २००८ रोजी घरी कोणी नसताना त्याने तिला अनेकदा झोपेतून उठविले. तिला चॉकले देण्याचे आमिष दाखवून घरातील एका छोट्या रुममध्ये नेले. तिथेच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या पंधरा दिवसांत त्याने तिच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुझ्या आई-वडिलांना नुकसान पोहचविण्याची त्याने तिला धमकी दिली होती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र दोन दिवसांनी तिने घडलेला प्रकार तिच्या परिचित नातेवाईकांना सांगितला होता. त्यानंतर तिने भायखळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा सोळा वर्षापूर्वी घडला होता, त्यामुळे या तक्रारीची पोलिसाकडून शहानिशा केली जात आहे. या आरोपी नातेवाईकांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान पिडीत तरुणीची जे. जे हॉस्पिटलमध्ये मेडीकल होणार आहे. या मेडीकलनंतर काही गोष्टींचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोळा वर्षांनंतर पिडीत मुलीने आरोपीविरुद्ध तक्रार केल्याने संबंधित कुटुंबियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.