अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार
खंडणीस्वरुपात दिड लाखांच्या कॅशसहीत आठ तोळे दागिने घेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – मोबाईलवर आंघोळ करताना अश्लील व्हिडीओ काढून एका महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केला होता. इतकेच नव्हे तर पिडीत महिलेकडून खंडणीस्वरुपात दिड लाख रुपये तसेच आठ तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी अकबर गांची या 37 वर्षांच्या आरोपीविरुद्ध कुरार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून शोध सुरु आहे.
35 वर्षांची तक्रारदार पिडीत महिला तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. याच परिसरात अकबर गांची राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. जानेवारी 2022 रोजी ती तिच्या घरातील बाथरुममध्ये आंघोळ करताना त्याने तिचे आंघोळ करताना काही अश्लील व्हिडीओ मोबाईलवर काढले होते. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडे खंडणीची मागणी करत होता. बदनामीच्या भीतीने त्याने तिला दिड लाखांसह आठ तोळे सोन्याचे दागिने खंडणी स्वरुपात दिले होते. तरीही तो तिला सतत ब्लॅकमेल करुन तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता.
काही दिवसांनी त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी सुरु केली होती. ही धमकी देऊन तो तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता. जानेवारी 2022 ते जून 2025 या कालावधीत अकबरकडून होणार्या मानसिक-शारीरिक छळासह खंडणीसाठी ब्लॅकमेलला ती कंटाळून गेली होती. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला होता. ही माहिती ऐकून त्याला धक्काच बसला होता. त्यामुळे तो अकबर गांची याला जाब विचारला होता. यावेळी त्याने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. त्याने त्याचा मोबाईल चोरी केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत अटक करण्यास पोलिसांना भाग पाडू असे सांगू लागला.
अखेर या दोघांनी अकबरविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी पिडीत महिलेने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अकबरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचार, खंडणीसह अन्य भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच अकबर पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.