पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
उशिरा शासकीय जीआर निघताच पदाची सूत्रे स्विकारली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पक्षपातीच्या आरोपासह फोन टॅपिंग प्रकरणात वादाच्या भोवर्यात सापडलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीदरम्यान पदावरुन बाजूला केल्यानंतर आता निवडणुकीची प्रक्रिया संपताच पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आले आहे. रात्री उशिरा शासकीय जीआर निघताच रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी दुसर्यांदा पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतले होते. त्यापूर्वी रश्मी शुक्ला यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरुन वाद सुरु असतानाच आता त्याचंी पुन्हा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रश्मी शुक्ला यांची सोमवारी ४ नोव्हेंबरला निवडणुक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकावरुन बदली केली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते, मंत्री आणि इतर राजकीय व्यक्तीचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. याच प्रकणात त्यांच्याविरुद्ध मुंबईसह पुण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र नंतर त्यांची दोन्ही गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची या गुन्ह्यांतील आरोपांतून सुटका झाली होती. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जात असून त्यांच्या कालावधीत पूर्ण होऊन त्यांची पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांची बदली व्हावी यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. निवडणुक आयोगाला कॉंग्रेस पार्टीच्या वतीने सतत पत्रव्यवहार करुन त्यांच्या बदलीचे मागणी केली जात होती.
अखेर रश्मी शुक्ला यांची बदली झाली होती. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांचे एक पॅनल तयार करुन नव्या पोलीस महांसचालकाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली होती. या पॅनलच्या शिफारशीवरुन संजयकुमार वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्तीचे आदेश निवडणुक आयोगाकडून काढण्यात आले. त्यांच्या नावाची घोषणा होताच संजयकुमार वर्मा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती. विधानसभेची निवडणक पार पडल्यानंतर निवडणुक आयोगाकडून रविवारी आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल होती. तसेच त्यांच्या पुर्ननियुक्तीची विनंती केली होती. या विनंतीनंतर सोमवारी रात्री शासकीय जीआर काढून रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्तीचे आदेश काढण्यात आले होते. रश्मी शुक्ला या ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्ती झाल्या आहेत. मात्र गृहविभागाने त्यांना ३ जानेवारी २०६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.