त्या महिलेसाठी रियल लाईफ रँचो बनला देवदूत

वेळीच प्रसुती करुन बाळासह महिलेचे प्राण वाचविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – थ्री इडियट चित्रपटात अभिनेता आमिर खचान याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एका महिलेची प्रसुती केली होती. या चित्रपटाला शोभेल अशीच घटना बुधवारी रात्री उशिरा मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकात घडली. रियल लाईफ रँचोने एका महिलेची रेल्वे स्थानकात त्याच्या डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने प्रसुती केली. रियल लाईफ रँचो विकास बेंद्रे याच्या या कामाचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. नेटकर्‍यांनी विकास बेंद्रे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.

मुंबई शहराची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. यावेळी रेल्वे प्रवाशांसह त्यांच्या सेवेसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अनेकदा वेगवेगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव येतो. बुधवारी रात्री या प्रवाशांसह रेल्वे पोलिसांना अशाच एका चांगल्या कामामुळे एका प्रवाशांवर गर्व निर्माण झाला होता. रात्री पाऊणच्या सुमारास चर्चगेटच्या जाणार्‍या एका लोकलमध्ये चैन पुलिंग झाले होते. त्यामुळे ही लोकल राम मंदिर स्थानकात थांबली होती. चौकशीदरम्यान एका महिलेमूुळे चैन पुलिंग झाल्याचे रेल्वे पोलिसांना समजले.

24 वर्षांची ही महिला विरार येथील जीवदानी क्रॉस रोड परिसरात राहत असून ती नऊ महिन्यांची गरोदर होती. तिला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्या होत्या. त्यामुळे ती लोकलने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घरातून निघाली होती, मात्र वाटेत तिला प्रचंड वेदना होऊ लागले. याच लोकलमध्ये विकास बेंद्रे हा प्रवासी प्रवास करत होता. त्याला हा प्रकार समजताच त्याने महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली होती. या महिलेला प्रसुतीमुळे प्रचंड वेदना होत होत्या. रेल्वे स्थानकात कोणीही डॉक्टर नव्हते, तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विकासने त्याच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन करुन तिथे घडलेला प्रकार सांगितला.

तिनेही तिचे सर्व काम बाजूला करुन त्याला व्हिडीओ कॉल करण्याचा सल्ला दिला होता. तिला व्हिडीओ कॉल केल्यानंतर तिने त्याला प्रसुतीबाबत काही टिप्स दिल्या होत्या. या व्हिडीओ कॉलवरुन त्याने ती सांगत असलेल्या माहितीवरुन महिलेची प्रसुती केली. बाळाची आणि आईची नाळ कशी कापावी याचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर तिने बाळासह त्याच्या आईची नाळ कापली. याच दरम्यान तिथे आलेल्या रेल्वे पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांना कॉल करुन राम मंदिर रेल्वे स्थानकात बोलावून घेतले.

तिच्या नातेवाईकांच्या मदतीने या महिलेसह तिच्या बाळाला नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. यावेळी रेल्वे पोलिसांनी महिलेसाठी विशेष रुग्णवाहिकीची व्यवस्था केली होती. त्यानंतर या महिलेसह तिच्या बाळाला तिच्या नातेवाईकांच्या देखरेखीखाली कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसताना विकास बेंद्रे याने त्याच्या डॉक्टर मैत्रिणीच्या सांगितलेल्या सूचनांचे तंतोतत पालन करुन या महिलेची प्रसुती करुन या दोघांची नाळ कापली होती.

इतकेच नव्हे तर रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला वेळीच उपचार मिळतील यासाठी प्रयत्न केले होते. या संपूर्ण घटनेची व्हिडीओ गुरुवारी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर विकास बेंद्रे याच्या कामाची अनेक नेटकर्‍यांने कौतुक केले होते. या घटनेनंतर महिलेसह तिच्या नातेवाईकांनी विकास बेंद्रे याच्यासह रेल्वे पोलिसांचे आभार मानले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page