रोहित शेट्टी यांच्या घरासमोरील फायरिंगप्रकरणी पाचव्या आरोपीस अटक

पाचही आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरासमोर झालेल्या फायरिंगप्रकरणी पाचव्या आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आसाराम श्रीरंग फासले ऊर्फ बाबू असे या आरोपीचे नाव असून तो पुण्याचा माळवाडी, यशोदिप चौकाचा रहिवाशी आहे. त्याच्यावर शूटरला शस्त्रे पुरविल्याचा आरोप दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या चारही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या चौघांसह आसाराम फासले याला गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने पाचही आरोपींना बुधवार 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रोहित शेट्टी हे विलेपार्ले येथील जेव्हीपीडी, नूतन लक्ष्मी सोसायटीच्या शेट्टी टॉवर या दहा मजली इमारतीमध्ये राहतात. 31 जानेवारीला रात्री उशिरा त्यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नव्हते. गोळीबारानंतर शूटर तेथून पळून गेले होते. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच दुसर्‍याच दिवशी पुण्यातून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यात स्वप्निल बंडू सकट, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दिपक येनपुरे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी यांचा समावेश होता.

या फायरिंगच्या गुन्ह्यांत चौघांचा सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने गुरुवार 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या चौकशीत आसाराम फासले याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना आसारामला गुरुवारी पुण्यातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत तो या कटातील मुख्य आरोपी शुभम लोणकर याच्या संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरुन त्याने शूटरला शस्त्रे पुरविल्याचे उघडकीस आले. आसारामसह इतर चारही आरोपींना गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने पाचही आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आसारामच्या अटकेने या कटात काही महत्त्वाचे खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासह इतर चारही आरोपींची लवकरच समोरासमोर चौकशी होणार आहे. या चौकशीतून आरोपींविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. रोहित शेट्टी यांच्या घरासमोर गोळीबार करण्यासाठी शुभम लोणकर याने शूटरसह इतर आरोपींना स्कूटरसह आर्थिक मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांना शुभमने कशा प्रकारे आर्थिक मदत पुरविले होते, गुन्ह्यांसाठी शस्त्रे कोठून आणण्यात आले,

शुभम हा आरोपीच्या संपर्कात सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून होता, मात्र अटकेपूर्वी आरोपींनी ते अ‍ॅप डिलीट करुन पुरावे नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत त्याच्यासह गोळीबार करणार्‍या एका शूटरला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांत पोलिसांनी गुन्ह्यांतील स्कूटर, पाच रिकाम्या पुंगळ्या, मोबाईल फोन, एक पिस्तूल, तीन मॅगझीन, एक एअरगन आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page