ट्रकच्या धडकेने 46 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका ट्रकच्या धडकेने गणेश पांडुरंग लोटनकर या 46 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्स, फार्मा झोनसमोर झाला.

संतोष पांडुरंग लोटनकर हे गोरेगाव येथील रामनगर परिरात राहतात. मृत गणेश हा त्यांचा मोठा भाऊ असून तो त्याच्या पत्नी आणि मुलासोबत नालासोपारा येथीलल डिवाईन शाळेजवळील महेश पार्क, तुळींज रोड, लक्ष्मी कवळे चाळीत राहतो. गेल्या वीस वर्षांपासून गणेश हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील गॉर्डन वुडरुफ लॉजिस्टिक लिमिटेड कंपनीत कमाला आहे. ही कंपनीतविविध देशात विमानाने जाणार्‍या मालांचे कागदपत्रांच्या क्लिअरचे काम करते. सोमवारी गणेश हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता.

सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता तो काही कागदपत्रे क्लिअरींगसाठी फार्मा झोनसमोरुन जात होता. यावेळी एका आयचर कंपनीच्या ट्रकने त्याला धडक दिली होती. त्याच्या कमरेवरुन ट्रकचा चाक गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी गणेशचा भाऊ संतोष लोटणकर यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरण गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर ट्रकचालक जखमी झालेल्या गणेश यांना वैद्यकीय मदत न देता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळाहून पळून गेला होता. ट्रकचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकावरुन त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page