क्षुल्लक भांडणातून चौदा वर्षांच्या मुलीवर चाकूने हल्ला

अंधेरीतील घटना; मद्यपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, – कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या क्षुल्लक भांडणातून एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्‍या एका मद्यपी आरोपीने चाकूने हल्ला केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. या हल्ल्यात मुलीला दुखापत झाली असून तिच्या हाताला चार टाके लागले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी सुभाष चव्हाण याच्याविरुद्ध भादवीसह अल्पवयीन न्याय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कुसूम अर्जुन गुप्ता ही महिला अंधेरीतील मरोळ पाईपलाईन परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे पती रिक्षाचालक आहे तर ती अंडागाडी चालविते. तिला तीन मुले असून ते सर्वजण शिक्षण घेतात. शुक्रवारी दुपारी बारा वाजता तिचे तिच्या शेजारी राहणार्‍या एका महिलेशी कपडे वाळत घालण्याच्या कारणावरुन किरकोळ वाद झाला होता. मात्र काही वेळात त्यांच्यातील भांडण मिटले होते. त्यानंतर ती तिन्ही मुलांना घरी ठेवून बदलापूरला कामानिमित्त गेली होती. रात्री साडेदहा वाजता ती घरी आली असता तिला तिची बारा वर्षांची मुलगी जोरजोरात रडत असल्याचे दिसून आली. सुरुवातीला तिला मुलांमध्ये वाद झाला असावा असे वाटले. मात्र चौकशी केल्यानंतर तिने शेजारी राहणार्‍या महिलेचा पती सुभाष चव्हाण याने सकाळच्या भांडणातून तिच्या घरी चाकू घेऊन आला होता. यावेळी त्याने भरपूर मद्यप्राशन केले होते. त्याने मुलीला तुझे वडिल कुठे आहेत अशी विचारणा केली, यावेळी मुलांनी आई-वडिल घरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या मोठ्या मुलीला हाताने मारहाण केली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने सुभाषला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने चाकूने तिच्या हातावर वार करुन तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. हा प्रकार नंतर तिने तिच्या वडिलांना सांगिता. तोपर्यंत कुसूम ही घरी आली होती.

चाकू हल्ल्यात तिच्या मुलीच्या मनगटासह कोपर्‍यावर दुखापत झाली होती. रक्त येत असल्याने तिने तातडीने तिला जवळच्या व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर तिने सहार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुभाष चव्हाणविरुद्ध ३२३, ३२४, ५०४, ५०६ (२) भादवी सहकलम ७५ अल्पवयीन न्याय अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून दारुच्या नशेत सुभाष चव्हाणने एका अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page