सैफअली खान हल्लाप्रकरणी गुन्ह्यांतील चाकूचा शोध सुरु
वांद्रे तलावासह खाडीजवळ वांद्रे पोलिसांची विशेष मोहीम
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान हल्ल्यातील गुन्ह्यांत वापरण्यात आलेला चाकू अद्याप वांद्रे पोलिसांनी हस्तगत केला नसून या चाकूचा शोध सुरु आहे. बुधवारी वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्यासोबत वांद्रे तलावासह खाडीलगत चाकूचा शोध घेतला, मात्र गुन्ह्यांत चाकू हस्तगत करण्यात पोलिसांना अद्याप यश आला नाही. या गुन्ह्यांत हा चाकू महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
चोरीच्या उद्देशाने सैफअलीच्या घरात घुसल्यानंतर शरीफुलचा चोरीचा प्रयत्न फसला गेला होता. त्यात सैफअलीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्याने त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यात चाकूचा एक तुकडा सैफअलीच्या शरीरात घुसला होता. हा तुकडा नंतर ऑपरेशननंतर काढण्यात आला होता. दुसरा तुकडा शरीफुलने फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने हा तुकडा वांद्रे तलावात फेंकून टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्याच्यासोबत वांद्रे पोलीस ठाण्याची एक टिम वांद्रे तलावाजवळ गेली होती. या पथकाने तलावात चाकूचा शोध घेतला, मात्र पोलिसांना चाकू सापडला नाही. त्याने तो तुकडा कुठे फेकला याबाबत पोलिसांना माहिती सांगितली नाही.
दुसरीकडे या घटनेनंतर सैफअली व त्याची पत्नी करीना कपूर खान यांना वांद्रे पोलिसांकडून पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत त्यांच्यासोबत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी राहणार आहेत. मात्र त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली याबाबत पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला. जखमी झालेल्या रिक्षाचालक भजनलाल याने सैफअलीला लिलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे त्याचे सैफअलीने आभार व्यक्त केले. इतकेच नव्हे तर त्याला पन्नास हजार रुपयाचे बक्षिस दिल्याचे बोलले जाते. अशा घटना रोखण्यासाठी आता पोलिसांकडून प्रत्येक सोसायटीमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. काही सोसायटीमध्ये जाऊन पोलीस बैठका घेणार आहेत.