पार्टनरशीप ऑफर देऊन गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणुक
व्यावसायिक दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – पार्टनरशीप ऑफर देऊन एका व्यावसायिकाला व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन सुमारे ५२ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका व्यावसायिक दाम्पत्याविरुद्घ साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इश्तियाक अब्दुल खलील शेख आणि गुलनाज इश्तियाक शेख अशी या पती-पत्नीची नावे आहेत. पैशांची मागणी केल्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाला अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची सांगून त्यांच्या हत्येची सुपारी देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश साकिनाका पोलिसांना देण्यात आली आहे.
अब्दुर्रकीब अब्दुल वाहिद मंसुरी हे साकिनाका परिसरात राहत असून त्यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांी रकिब इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी असून ही कंपनी भंगार व्यवसायासह जुन्या इमारती पाडणे, बांधकामाशी व्यवसायाशी संबंधित आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या परिचित व्यक्तीने त्यांना त्याच्याकडे कंन्स्ट्रक्शनशी संबंधित बरीच कामे आहेत. तुम्हाला नवीन कामाची गरज असल्यास एमआयजीएस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे मालक व संचालक इश्तियाक आणि त्यांची पत्नी गुलनाज यांची भेट घ्यावी लागेल असे सांगितले. त्यांच्याकडून त्यांना भरपूर कामे मिळतील असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची त्यांच्या धारावीतील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांाच्याकडे दोन कंपन्या असून या कंपन्याकडून त्यांना काम मिळेल. त्यासाठी त्यांनी त्यांना पार्टनरशीपची ऑफर दिली होती. त्यांच्या कंपनीत दोन ते तीन कोटी रुपयांची गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते.
कंपनीत पार्टनरशीप आणि प्रॉफीटमध्ये चांगला परतावा मिळत असल्याने त्यांना त्यांची ऑफर आवडली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणुक, कामगाराचे पगार आणि साहित्यासाठी सुमारे ५२ लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र ही रक्कम गुंतवणुक करुनही त्यांना संचालकासह जॉईट अकाऊंड म्हणून सामिल करुन घेण्यात आले नव्हते. त्यांच्यात झालेल्या करारात त्यांची कंपनीत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी इश्तियाक शेख याने त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन अरेरावी भाषा केली. पैसे परत करणार नाही, पैशांची मागणी केल्यास त्यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणण्याची धमकी दिली होती. तुझ्यासारखे अनेक गुंतवणुकदार माझ्या अवतीभवती फिरताना, त्यामुळे तुझे पैसे परत मिळणार नाही. त्याचे अंडरवर्ल्डशी चांगले संबंध असल्याचे सांगितले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इश्तियाक शेख आणि गुलनाज शेख या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अशाच प्रकारे त्यांनी इतर काही गुंतवणुकदरांना पार्टनरशीप ऑफर करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.