मशिदीच्या बाजूने ड्रोन दिसल्याच्या कॉलने खळबळ

चौकशीनंतर ड्रोनची ती अफवा असल्याचे उघडकीस

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मे 2025
मुंबई, – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दशहतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी साकिनाका परिसरातील एका मशिदीच्या बाजूने ड्रोन दिसल्याच्या व्हिडीओमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चौकशीनंतर ड्रोनची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. ती अफवा असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

शुक्रवारी सकाळी सव्वापाच वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला हॉटलाईनवर एससीसी सहार विमानतळ येथून एक कॉल प्राप्त झाला होता. त्यात साकिनाका परिसरात हजरत तय्यद जलाल (गैबन शाह दर्गा) या मशिदीजवळ एक ड्रोन पाहण्यात आला आहे. हा ड्रोन मशिदीजवळून उजव्या बाजूच्या स्लम एरिया गेला होता. ही माहिती कंट्रोल रुममधून साकिनाका पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चौकशीत अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे उघडकीस आला.

याबाबतची माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. ड्रोन पाहिल्याचा मॅसेजने साकिनाका पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र ती अफवा असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. त्यात भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ले सुरुच ठेवल्याने देशभरात सर्वत्र सतर्कचा इशारा देण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच ड्रोन उडविण्यास बंदी घातली आहे. त्यात शुक्रवारी साकिनाका परिसरातील एका मशिदीजवळ ड्रोनविषयी माहिती प्राप्त होताच परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्याची पोलिसांकडून शहानिशा करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page