एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी ३८ वर्षांच्या आरोपीस अटक

७६ लाख ५० हजाराचा ५१० ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जानेवारी २०२५
मुंबई, – एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी एका ३८ वर्षांच्या आरोपीस साकिनाका पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जमॉंबदरुज्जन चौहाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ७६ लाख ५० हजार रुपयांचा ५१० ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील समर्थनगर परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती साकिनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नागरे, पोलीस हवालदार कदम, सौंदरमल, पोलीस शिपाई शेख, कोळेकर, कदम, शिगवण यांनी समर्थनगर सहकारी सोसायटीजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद चौहाण याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ५१० एमडीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत ७६ लाख ५० हजार रुपये आहे.

तपासात मोहम्मद चौहाण हा साकिनाका येथील अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कैलासपुरम मोहिली परिसरात राहतो. तो त्याच्या परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करत होता. त्यासाठी तो काही ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page