मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका शिक्षिका तरुणीवर लैगिंक अत्याचा करुन तिची फसवणुक केल्याप्रकरणी हसन मुक्तार सय्यद या प्रियकराला सोमवारी साकिनाका पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शिक्षिका म्हणून काम करणारी २४ वर्षांची पिडीत तरुणी ही विक्रोळीत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरात हसन राहत असून तो टेलर म्हणून काम करतो. सहा वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध झाले होते. ते दोघेही नियमित एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र मार्च २०१९ साली त्याने दुसर्या तरुणीसोबत लग्न केले होते, ही माहिती समजताच तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. चार वर्षापूर्वी त्याने तिला फोन करुन भांडुप येथे बोलाविले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी गेली होती. यावेळी त्याने तिला त्याचे तिच्यावर अजूनही प्रेम आहे. त्यामुळे तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगतले होते. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा बोलणे सुरु झाले होते. अनेकदा तो तिला तिच्या कॉलेजमध्ये भेटायला येत होता. यावेळी ते दोघेही साकिनाका येथील एका हॉटेलमध्ये जात होते. आपण लवकरच लग्न करु असे सांगून त्याने तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. जून २०२४ पर्यंत त्यांच्यात तीन ते चार वेळा शारीरिक संबंध आले होते.
मात्र काही दिवसांपासून त्याने तिला तिच्याशी लग्न करण्यास नकार देत त्याच्या पत्नीला सोडणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्याला तिच्यासोबत संबंध ठेवायचे नाही असे सांगून तिच्याशी असलेले संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. लग्नाचे आमिषाने हसनकडून शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने साकिनाका पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.