मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – यूट्यूब पाहून दबंग सिनेअभिनेता सलमान खान याला धमकी देणे एका सुतारकाम करणार्या तरुणाला चांगलेच महागात पडले. मुंबई पोलिसांच्या मुख्य कंट्रोल रुमच्या व्हॉटअप क्रमांकावर सलमानच्या नावाने दहा कोटी रुपयांच्या खंडणीचा मॅसेज पाठविणार्या एका सुतार काम करणार्या तरुणाला वांद्रे पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या बरेली शहरातून अटक केली. मोहम्मद तय्यब ताहीर अली असे या आरोपीचे नाव असून टाईमपास म्हणून त्याने हा मॅसेज पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ट्रॉन्झिंट रिमांडवर मुंबईत आणल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. सलमानवर दहशत निर्माण व्हावी म्हणून बिष्णोई टोळीकडून त्याच्या वांद्रे येथील राहत्या घराजवळ गोळीबारही करण्यात आला होता. तेव्हापासून सलमान बिष्णेाई टोळीकडून सतत धमकी दिली जात होती. त्यातच वांद्रे येथे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची बिष्णोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर संपूर्ण बॉलीवूडसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या गोळीबारप्रकरणी आतापर्यंत बिष्णोई टोळीशी संंबंधित पंधरा आरेापींना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सुरु असताना सलमानला खंडणीसाठी येणार्या धमक्याचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या व्हॉटअप क्रमांकावर सलमान खानच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मॅसेज पाठविला होता. सलमानकडे या व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल दहा कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील असे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आले होते.
ही माहिती नंतर कंट्रोल रुममधून वांद्रे पोलिसांना देण्यात आली होती. या धमकीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन धमकीचा मॅसेज उत्तरप्रदेशातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वांद्रे पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला गेली होती. या पथकाने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बरेली शहरातून मोहम्मद तय्यब याला संशशित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सलमानकडे दहा कोटीच्या खंडणीची मागणी करुन खंडणीची रक्कम दिली नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. तपासात मोहम्मद तय्यब हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सुतारकाम करतो. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन त्याची ट्रॉन्झिंट रिमांड घेतले होते. बुधवारी मुंबईत आणल्यानंतर त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
मोहम्मद तय्यब हा गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर सलमानचे व्हिडीओ पाहत होता. त्यात त्याला त्याच्याविषयी बरीच माहिती प्राप्त झाली होती. सलमान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर होता. त्यामुळे त्याने टाईमपास म्हणून त्याच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या व्हॉटअप क्रमांकावरच धमकीचा मॅसेज पाठविला होता. मात्र टाईमपास म्हणून केलेला हा मॅसेज त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.