मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – इंडिया गॉट लेटेंड कार्यक्रमाच्या माध्यमातून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिका करुन वादाच्या भोवर्यात सापडलेूला यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांना महाराष्ट्र सायबर विभागाकडून समन्स बजाविण्यात आले आहे. येत्या सोमवारी १७ फेब्रुवारीला या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी कॉमेडियन समन रैना याने त्याच्या इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमांत यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमांक पाहुणा म्हणून आलेल्या रणवीरने काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर सोशल मिडीयावर प्रचंड टिका झाली होती. हा प्रकार लक्षात येताच रणवीरकडून जाहीर माफी मागण्यात आली होती. याप्रकरणी खार पोलिसांसह महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर विभागाने संबंधित् ३१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत काहींची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. आता हास्य कलाकार समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. सोमवारी १७ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहावे असे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची सोमवारी चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई होणार आहे.