संजय राऊत यांच्या घरासमोरील रेकीमागे खोदा पहाड निकला चुहा
जिओचे नेटवर्क टेस्ड ड्राईव्ह झाल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानाची रेकी करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मैत्री निवासस्थानाचे काही फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोप होता. याप्रकरणी संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनिल राऊत यांनी कांजूरमार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. तपासात ते दोघेही एका खाजगी कंपनीचे कर्मचारी होते, जिओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्राईव्हसाठी ते दोघेही तिथे आल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे या घटनेमागे काहीही संशयास्पद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या रेकीच्या घटनेने दिवसभर अनेक तर्कवितकामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच या घटनेमागे खोदा पहाड निकला चुहा अशी परिस्थिती झाली आहे.
संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तर त्यांचा भाऊ सुनिल राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. ते सध्या भांडुपच्या मैत्री निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांच्या निवासस्थानी दोन तरुण बाईकवरुन संशयास्पदरीत्या फिरत होते. या दोघांनी मैत्री निवासस्थानाचे मोबाईलवरुन फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हा प्रकार नंतर काही पत्रकारांकडून राऊत यांना देण्यात आला होता. त्यानंतर निवासस्थानासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन तरुण बाईकवरुन फिरत असतानादिसून आले. या दोघांची हालचाल संशयास्पद होती. त्यांनी हेल्मेट आणि जॅकेट घातले होते, त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नव्हते. हा प्रकारानंतर सुनिल राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत कांजूरमार्ग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या प्रकरणाचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या दहा विशेष पथकाने तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या बाईकस्वाराचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. आरोपींनी ओळख पटू नये म्हणून पुरेपुरे काळजी घेतली होती. गेटची रेकी केल्यानंतर या दोघांनी मोबाईलवरुन व्हिडीओ आणि फोटो काढले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसून आले आहे. ऑक्टोंबर महिन्यांत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली होती. हत्येपूर्वी आरोपींनी त्यांच्या घरासह कार्यालयाची रेकी केली होती. ही रेकी केल्यानंतर बाबा सिद्धीकी यांची त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली होती. दरम्यान सुनिल राऊत यांनी पत्रकारांना माहिती देताना संजय राऊत यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल असे सांगितले. दरम्यान सकाळी घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
मात्र तपासात ते दोघेही सेलप्लॅन व इनस्टा आयसीटी सोल्यूशन कंपनीचे कर्मचारी असल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी कंपनीचे चार कर्मचारी तिथे आले होते. ते सर्वजण जिओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करत होते. त्यामुळे ते मोबाईलवरुन तपासणी करत होते. त्यांनी मैत्री निवासस्थानाचे फोटो किंवा व्हिडीओ काढले नाही. या कंपनीच्या कर्मचार्यांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कंपनीची पोलिसांकडून खात्री करुन घेण्यात आली असून त्यात संशयास्पद काहीही नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.