बिग बिलियन डेदरम्यान 31 लाखांचा 423 महागड्या वस्तूंची चोरी
खाजगी कंपनीच्या दोन डिलीव्हरी बॉयविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 डिसेंबर 2025
मुंबई, – ऑक्टोंबर महिन्यांत आयोजित करण्यात आलेलया बिग बिलियन डेदरम्यान सुमारे 31 लाख रुपयांच्या महागड्या वस्तूची चोरी करुन अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. सीसीटिव्ही फुटेजमध्ये या चोरीमागे कंपनीच्याच दोन डिलीव्हरी बॉयचा सहभाग उघडकीस आल्यानंतर या दोघांविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सज्जाद खान आणि तुषार सुनिल प्रसाद अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.
जयवंत नामदेव मते हे 60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवलीतील योगी नगर परिसरात राहतात. सध्या ते बंगलोरच्या इन्स्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी वाहनातून कुरिअर, लॉजिस्टिक, वाहतूक स्टोरअॅजचे काम करते. ई कार्ट सर्व्हिस या ब्रॅण्डचा त्यांचा व्यवसाय आहे. कंपनीतील कायदेशीर बाबी हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विलेपार्ले येथे त्यांच्या कंपनीचे एक डिलीव्हरी हबअसून तिथे 46 कर्मचारी कामााला आहेत. याच हबमध्ये भरत गणेश आरेकर आणि महादेव गुरव हे मॅनेजर तर सज्जाद आणि तुषार हे दोघेही डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतात.
1 ऑक्टोंबर ते 30 ऑक्टोंबरला फ्लीपकार्ट कंपनीचा बिग बिलियन डेचा मोठा सेल होता. या कंपनीशी त्यांच्या कंपनीचा करार होता. यावेळी विक्री झालेल्या विविध वस्तूंची डिलीव्हरी करणे आणि कॅश ऑन डिलीव्हरी रक्कम गोळा करुन कंपनीत जमा करण्याची सज्जाद आणि तुषारवर होती. 31 ऑक्टांबरला बिग बिलियन डेचा सेल संपलाआणि दुसर्या दिवशी फ्लीपकार्ट कंपनीच्या मुख्य कार्यालयातून त्यांना एक मेल प्राप्त झाला होता. त्यात सेलमधील 85 हून अधिक उच्च किंमतीचे प्रोडेक्ट मिसिंग असल्याचे नमूद करण्यात आले. या मेलची कंपनीने गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली होती.
त्यात विविध नामांकित कंपनीचे 13 लाख 63 हजार 218 रुपयांचे 44 मोबाईल, 7 लाख 55 हजार 159 रुपयांचे विविध घड्याळ, 1 लाख 23 हजार 038 रुपयांचे सोळा एअर बुड्स, 68 हजार 914 रुपयांचे तीन कॅनॉन कंपनीचे कॅमेरे, 53 हजार 048 रुपयांचे दोन लॅपटॉप, 29 हजार 852 रुपयांचे स्पिकर, 7 लाख 88 हजार 116 रुपयांचे विविध कपडे, बुट, परफ्युम आदी 322 वस्तू असा 31 लाख 81 हजार 345 रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता.
बिग बिलियन डेच्या कार्यक्रमांचे सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर 1 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत सज्जाद खान आणि तुषार प्रसाद यांनी सुनियोजित पद्धतीने नियमांचे उल्लघंन स्वतच्या फायद्यांसाठी संबंधित महागड्या वस्तूची चोरी करुन अपहार केल्याचे दिसून आले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार निदर्शनास येताच त्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठांना देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी जयवंत मते यांना कंपनीच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानंतर जयवंत मते यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात जाऊ सज्जाद खान आणि तुषार प्रसाद यांच्याविरुद्ध 31 लाख 81 हजार 345 रुपयांच्या महागड्या वस्तूंची चोरी करुन अपहार केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.