हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करुन सिंगरची कॅश चोरट्याने पळविली

सांताक्रुज येथील सी प्रिसेंस हॉटेलच्या घटनेने खळबळ

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – हॉटेलच्या कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने रुममध्ये प्रवेश करुन हरियाणाच्या एका सिंगरची 35 हजार रुपयांची कॅश चोरी केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज येथील सी प्रिसेंस हॉटेलमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने हॉटेलच्या कर्मचार्‍यासह गेस्टमध्ये एकच खळबळ उडाली होती. सिंगरच्या तक्रारीवरुन सांताक्रुज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हॉटेलच्या कर्मचार्‍यानेच ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

श्रमती चेतना शुक्ला ही 48 वर्षांची तरुणी मूळची हरियाणाच्या गुडगाव, सुशांत लोक दोनची रहिवाशी असून ती सिंगर म्हणून करते. गेल्या आठवड्यात ती तिची मैत्रिण दिपीका खुराणा आणि मेकअप आर्टिस्ट सुदर्शनजीत संभरवाल यांच्यासोबत मुंबई शहरात फिरण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी सांताक्रुज येथील जुहू-तारा रोड, सी प्रिसेंस हॉटेलमध्ये 102 क्रमांकाचा एक रुम बुक केला होता. गुरुवारी 22 जानेवारीला ते तिघेही अंधेरीतील लोखंडवाला येथे शॉपिंगसाठी आले होते.

सायंकाळी चार वाजता हॉटेलमध्ये आल्यानंतर ते तिघेही सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. रात्री उशिरा ते पुन्हा हॉटेलमधील रुममध्ये आले होते. यावेळी तिला तिच्या सुटकेसमधून 35 हजार रुपयांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. तिने सर्वत्र कॅशचा शोध घेतला, मात्र त्यांना कॅश कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मॅनेजरला बोलावून विचारणा केली होती. यावेळी मॅनेजरने सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन चौकशी करतो असे सांगितले.

या घटनेनंतर श्रमती शुक्ला हिने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पश्चिम उपनगरातील सी प्रिसेंस एक नामांकित हॉटेल असल्याने त्याची हॉटेल प्रशासनाने गंभीर दखल घेत स्वतंत्रपणे तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हॉटेलचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन संशयित आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page