प्रॉपटीवरुन मानसिक शोषण करुन वयोवृद्ध पित्याला घराबाहेर काढले

पित्याला त्रास देणार्‍या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – प्रॉपटीवरुन सतत होणार्‍या मानसिक शोषणानंतर मुलाने त्याच्याच वयोवृद्ध पित्याला बेदम मारहाण करुन घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीतील वर्सोवा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कैलास किसन सोलंकी या मोठ्या मुलाविरुद्ध वर्सोवा पोलिसंनी भारतीय न्याय सहिता आणि ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपी मुलाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वर्सोवा पोलिसांना दिले आहेत.

75 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार किसन हुका सोलंकी हे अंधेरीतील जे. पी रोडच्या वर्सोवा, हुकाभाई चाळीतील देवाची वाडीत राहतात. त्यांचा कैलास हा मोठा मुलगा असून त्याच्यासोबत त्यांचे प्रॉपटीवरुन वाद सुरु आहेत. त्यांच्या व्यवसायातील बोटीच्या हिशोबाच्या चोपड्या, बिल बुक आदी सर्व कागदपत्रे त्याच्याकडे आहेत. या कागदपत्रांची वारंवार मागणी करुनही तो त्यांना त्यांचे कागदपत्रे देत नव्हता. याच कारणावरुन तो त्यांच्याशी वाद घालून त्यांचा सतत मानसिक शोषण करत होता. त्यांचा सांभाळ न करता, त्यांना दैनदिन खर्चासाठी तसेच त्यांच्या उदरनिर्वाहसाठी पैसे देत नव्हता. त्यांचे पालनपोषण करत होता.

शनिवारी 4 ऑक्टोंबरला सकाळी साडेसात वाजता ते देवपूजा करत होते. यावेळी तिथे कैलास आला आणि त्याने त्यांच्या घराचे लाकडी दरवाजा तोडून त्यांच्या चारचाकी वाहनाचे काच फोडून नुकसान केले होते. शिवीगाळ करुन त्यांना हाताने बेदम मारहाण केली होती. इतकेच नव्हे त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढले. हा प्रकार स्थानिक रहिवाशांकडून त्यांचा लहान मुलगा पियुषला समजताच तो तिथे आला होता. त्याने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर किसन सोलंकी हे त्यांच्या लहान मुलगा पियुषसोबत वर्सोवा पोलीस ठाण्यात आले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी त्यांचा मोठा मुलगा कैलास सोलंकी यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कैलास सोलंकीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page