मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ग्रॅटरोडच्या एका निवासी इमारतीमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी अंजू सुमेर हरिजन या ४३ वर्षांच्या मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या चारही महिलांना नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ग्रँटरोड येथील सुरु असलेल्या सेक्स रॅकेटविरोधात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असताना ग्रॅटरोड येथील पाववाला पथ, सिम्पलेक्स इमारतीमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत. या माहितीची शहानिशा करण्यासाठी संबंधित पोलीस पथकाने सिम्प्लेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक एकमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे काही महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले. याच रुममधून पोलिसांनी चार महिलांची सुटका केली होती. त्यांच्या चौकशीतून हा प्रकार उघड होताच मॅनेजर म्हणून काम करणार्या अंजू हरिजन हिला पोलिसांनी अटक केली. अजू ही कुंटनखान्यांचा मालक नारायण यादव याच्या मदतीने तिथे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर अंजूला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर चारही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.