मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ग्रँटरोड येथील इमारतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सुधीर जगन्नाथ शर्मा या ४२ वर्षांच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली तर सहा तरुणींची सुटका केली. मेडीकलनंतर या सर्व तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. आरोपी सुधीर शर्माविरुद्ध भारतीय न्याय सहिता सकलम पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ग्रँटरोड येथील इमारतीमध्ये सुरु असलेल्या कुुंटनखान्यातील सेक्स रॅकेटच्या विरोधात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना ग्रँटरोडच्या कॉंग्रेस हाऊस, नूर मोहम्मद इमारतीमध्ये काही तरुणींना डांबून ठेवून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहकाला पाठविले होते. या बोगस ग्राहकाकडून तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचा सिग्नल प्राप्त होताच पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे, विलास तुपे, पोलीस उपनिरीक्षक विनोद ढोरे, पोलीस हवालदार तळेकर, पोलीस शिपाई संदीप बेडकुळे, पालवणकर, कांबळे, शेळके, महिला पोलीस शिपाई गवळी यांनी नूर मोहम्मद इमारतीच्या तळमजल्यावरील रुम क्रमांक नऊमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते.
या कारवाईत पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली. त्यापैकी एक तरुणी मूळची आसाम तर तीन तरुणी कोलकाता येथील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. चौकशीत सुधीर शर्मा हा कुंटनखान्यांचा मॅनेजर असून तो त्यांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिथे असलेल्या सुधीर शर्माला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या सर्व तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.