मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – चेंबूर येथील सेक्स रॅकेटप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. आफ्ताब आलम रमजानअली अन्सारी आणि हरिलाल बंधू चौधरी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह चार तरुणींची सुटका केली आहे. त्यांना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहेत.
मुंबई शहरात सेक्स रॅकेट चालविणार्या काही टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या काही अल्पवयीन मुलीसह तरुणींना ग्राहकांच्या मागणीनुसार या मुलीसह तरुणींना वेगवेगळ्या हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्यव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती एपीआय गावडे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित दलालाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह तरुणींची मागणी केली होती. या दलालाससह बोगस ग्राहकांचे फोनवरुन आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहारानंतर त्याने त्याला काही तरुणींना घेऊन चेंबूर येथील सी. जी गिडवानी रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.
मंगळवारी दुपारी तीन वाजता आफ्ताब अन्सारी आणि हरिलाल चौधरी हे दोघेही पाच तरुणींना घेऊन आले होते. यावेळी त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरु असताना प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, चिकणे, पोलीस उपनिरीक्षक रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, बेलणेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देसाई, पोलीस हवालदार भालेराव, डेल, पोलीस शिपाई जाधव, तुपे, बोधारे, ससाणे, महिला पोलीस शिपाई सरोदे, सुतार, एपीआय गावडे यांनी हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला होता.
यावेळी दोन्ही दलाल आफ्ताब आणि अन्सारी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली तर पाचही तरुणींची सुटका केली. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता. मेडीकलनंतर या पाचजणींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना बुधवारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.