मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – मुंबई शहरात सुरु असलेल्या दोन वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सहार आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका केली आहे. या सर्वांना आणि कांदिवली आणि मानखुर्दच्या रेस्क्यू होमध्ये पाठविण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींच्याच्या गरीबीचा फायदा घेऊन या दोन्ही महिलांना त्यांना वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
वैशाली नावाची एक 29 वर्षांची महिला चेंबूर येथे राहते. तिच्या संपर्कात काही अल्पयीन मुली असून या मुलींच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन ती ग्राहकांसोबत अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट आठच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने वैशाली संपर्क साधून तिच्याकडे अल्पवयीन मुलीची मागणी केली होती. फोनवरुन त्यांच्यात पैशांचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर या बोगस ग्राहकाने तिला मुलीला घेऊन अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता वैशाली ही एका पंधरा वर्षांच्या मुलीसोबत हॉटेलमध्ये आली होती. यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वैशालीला ताब्यात घेतले. तिच्या तावडीतून पोलिसांनी एका पंधरा वर्षांच्या मुलीची सुटका केली. ही मुलगी चेंबूर येथे राहते. तिलाच तिने वैश्याव्यवसायासाठी तिथे आणले होते. मेडीकलनंतर या मुलीला कांदिवलीतील एका खाजगी रेस्क्यू होममध्ये पाठविण्यात आले. याप्रकरणी भान्याससह पिटा, पोक्सो कलमांर्तत गुन्हा दाखल होताच वैशालीला अटक करुन पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आले.
अन्य एका कारवाईत किरणदेवी नावाच्या एका 40 वर्षांच्या महिलेस टिळकनगर पोलिसांनी अटक केली. तिच्या तावडीतून पोलिसांनी एका सतरा वर्षांच्या मुलीसह दोन महिलांची सुटका केली. किरणदेवी ही चेंबूर येथे राहत असून ती ग्राहकांच्या मागणीनुसार अल्पवयीन मुलीसह महिलांना विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत होते. फोनवरुन ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एक मोबाईल, मेमरी कार्ड, चार हजाराची कॅश व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. अल्पवयीन मुलीसह दोन्ही महिलांना मेडीकलनंतर मानखुर्दच्या नवजीवन सुधारगृहात पाठविण्यात आले होते. याप्रकरणी पिटा, भारतीय न्याय सहिता आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोन्ही महिलांना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.