मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ जुलै २०२४
मुंबई, – अंधेरी येथे सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी प्रिया ऊर्फ काली सुकू सरदार नावाच्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध भारतीय दंड सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर दोघींनाही कांदिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
प्रिया नावाची एक महिला सेक्स रॅकेट चालवत असून ती तिच्या परिचित काही महिलांना पैशांचे प्रभोलन दाखवून ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी विविध लॉज, हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये पाठवत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने प्रियाला संपर्क साधून तिच्याकडे काही महिलांची मागणी केली होती. यावेळी तिने प्रत्येक महिलामागील पैशांची बोलणी करुन बोगस ग्राहकाला अंधेरीतील ओशिवरा, हिरापन्नाजवळील साईलिला गेस्ट हाऊसमध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रिया दोन महिलांसोबत साईलिला गेस्ट हाऊसमध्ये आली होती. यावेळी तिचे बोगस ग्राहकासोबत पैशांचा व्यवहार सुरु असताना पोलिसांनी तिथे कारवाई करुन प्रियाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्यासोबत असलेल्या दोन महिलांची चौकशी केली असता प्रिया ही सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन ते ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी तिथे आल्याचे सांगितले. पैशांचे प्रलोभन दाखवून प्रियाने त्यांना या व्यवसायात आणले होते. ग्राहकांकडून मिळालेली काही रक्कम त्यांना देऊन उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती. हा प्रकार उघडकीस तिला पोलिसांनी अटक केली तर दोन्ही महिलांची सुटका केली. या दोन्ही महिलांची मेडीकल करुन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अटकेनंतर प्रिया सरदारला पुढील कारवाईसाठी ओशिवरा पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.