मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 जुलै 2025
मुंबई, – नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणार्या धारावीतील मुस्लिमनगरात रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सर्वरीबानो शेख नावाची एक महिला जखमी झाली. तिच्या हाताला एक गोळी लागली असून ही गोळी ऑपरेशनद्वारे काढण्यात डॉक्टरांना यश आले. गर्दीच्या वेळेस शूटरने अचानक गोळीबार केला होता, त्याच्या टार्गेटवर सर्वेरीबानो होती की अन्य कोण याचा आता पोलीस तपास करत आहेत. दरम्यान शाहूनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह आर्म्स अॅक्टतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
सर्वरीबानो ही महिला धारावी परिसरात तिच्या पती आणि मुलांसोबत राहतो. शेख कुटुंबिय मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. सात वर्षांपासून तिचा पती परिसरात फळ विक्रीचे काम करतो तर सर्वरीबानो ही तीन वर्षांपूर्वीच मुंबईत आली होती. तेव्हापासून ती तिच्या पती आणि मुलांसोबत तिथे राहत होती. रविवारी रात्री ती मार्केटमध्ये आली होती. मुस्लिमनगरातील मशिदीजवळ रात्री साडेनऊ वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. यावेळी तिला तिच्या हातातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला तिच्या हाताला एक गोळी लागल्याचे समजले. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन ऑपरेशनद्वारे तिच्या हातातील गोळी काढण्यात आली होती.
ही माहिती प्राप्त होताच शाहूनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वरीबानोची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात शूटरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मुस्लिमनगर परिसर हा नेहमीच गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तिथे रविवारी रात्री गर्दी होती. याच गर्दीतून अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता, एक गोळी सर्वरीबानोच्या हाताला लागली. शूटरला शर्वरीबानोवर गोळीबार करायचा होता,
या गोळीबारामागे त्याचा काय उद्देश होता किंवा शूटरच्या टार्गेटवर दुसरा कोणी व्यक्ती होता, मात्र चुकून ती गोळी शर्वरीबानोला लागली याचाही आता पोलीस तपास करत आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन अज्ञात शूटरची ओळख पटवून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.