शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून निवृत्त बँक अधिकार्‍याची फसवणुक

51 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर टोळीच्या सदस्याला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परताव्याचे आमिष दाखवून एका निवृत्त वयोवृद्ध बँक अधिकार्‍याची सुमारे 51 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका सायबर टोळीतील सदस्याला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. वसीम मेहबूब शेख असे या आरोपीचे नाव असून त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाते पुरविल्याचा आरोप आहे. याकामी त्याला या सायबर ठगाने काही रक्कम कमिशन म्हणून दिली होती. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गणेश रामकृष्ण लोणकर हे 63 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार गोरेगाव येथे राहतात. ते एका बँकेतून निवृत्त झाले असून त्यांची पत्नी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. 13 जूनला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांचा मोबाईल क्रमांक एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करणत आला होता. हा ग्रुप एका खाजगी कंपनीचा होता. त्यात शेअरसंदर्भातील माहिती दिली जात होती. ग्रुपमधील सभासद त्यांनी गुंतवणुक केलेल्या शेअरसंदर्भात चर्चा करत होते. कोणाला कुठल्या शेअरमध्ये किती फायदा झाला, आणखीन कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास आपल्याला आणखीन फायदा होईल याबाबत ही चर्चा असायची.

याच दरम्यान त्यांना ग्रुप अ‍ॅडमीनने संपर्क साधून शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अ‍ॅडमिनने त्यांच्या आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती घेतली होती. तसेच त्यांना अ‍ॅप पाठवून त्यात त्यांची माहिती भरण्यास सांगण्यात आले होते. ते अ‍ॅप ओपन करुन त्यांनी स्वतचे एक ट्रेडिंग खाते बनविले होते. त्यानंतर त्यांनी विविध शेअरमध्ये 30 लाख 65 हजार 450 रुपयांची गुंतवणुक केली होती. याच दरम्यान त्यांना अन्य एका सोशल साईटवर अन्य एका कंपनीची शेअर ट्रेडिंगची जाहिरात दिसली होती. ही जाहिरात क्लिक केल्यानंतर त्यांना त्यांच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. तिथेही त्यांना तोच प्रकार दिसून आला होता.

ग्रुप अ‍ॅडमिनने त्यांना इतर कंपन्याच्या तुलनेत त्यांची कंपनीत जास्त परतावा देत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी या कंपनीत 21 लाख 25 हजाराची गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही कंपनीत विविध शेअरमध्ये 51 लाख 90 हजार 450 रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना पहिल्या कंपनीत 1 कोटी 46 लाख 84 हजार 645 तर दुसर्‍या कंपनीत 1 कोटी 23 लाख 38 हजार 232 रुपयांचा मूळ रक्कमेसह प्रॉफिट झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वारंवार प्रयत्नही त्यांना ती रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे त्यांनी ग्रुप अ‍ॅडमिनकडे विचारणा केली होती, यावेळी त्यांनी त्यांना टॅक्स म्हणून काही रक्कम जमा करण्यास सांगितली,

ही रक्कम ट्रान्स्फर केल्याशिवाय त्यांची रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येणार नाही. त्यानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ केले होते. शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून या सायबर ठगांनी त्यांना विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले. मात्र गुंतवणुक रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच गणेश लोणकर यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही कंपनीशी संबंधित सात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वसीम शेख याला अटक केली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले. त्याच्यासह इतर आरोपींनी सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविले होते, या खात्यात जमा झालेली रक्कम सायबर ठगांना ट्रान्स्फर केली. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात हा प्रकार उघडकीस येताच वसीमला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page