शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने साडेआठ कोटीची फसवणुक

पवईतील घटना; दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – शेअरमार्केट गुंतवणुकीवर अल्पावधीत जास्तीत जास्त परवाता देतो असे सांगून एका व्यावसायिकाची दोन ठगांनी सुमारे साडेआठ कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन संशाक विपर्थी आणि फॉजिया विपर्थी या दोन्ही ठगांविरुद्ध पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

राजा शेखर रेड्डी हे व्यावसायिक असूनते पवईतील हिरानंदानी गार्डन, वेरोना अपार्टमेंटमध्ये राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची संशाक आणि फॉजिया यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांचा शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय असून त्यांनी आतापर्यंत अनेकांचे पैसे शेअरमार्केटमध्ये गुंतविले आहे. या गंुंतवणुकीवर त्यांना अल्पावधीत चांगला परवाता मिळाला आहे. त्यामुळे त्यांनीही शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्याकडे काही रक्कम शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. या गुंतवणुकीवर त्यांना सुरुवातीला त्यांनी चांगला परतावा परत करुन त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यानंतर या दोघांनी त्यांंच्यासह त्यांचा मित्र शशीर यांच्याकडून जानेवारी २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत आठ कोटी चाळीस लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.

मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. सतत मागणी करुनही त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुंतवणुक केलेली मूळ रक्कम परत मिळावी यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र त्यांनी ती रक्कमही त्यांना परत केली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच राजा रेड्डी यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला होता. या तपासात संशाक विपर्थी आणि फॉजिया विपर्थी या दोघांनी एका खाजगी कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची सुमारे साडेआठ कोटीची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page