चांगला परताव्याचे गाजर दाखवून नऊ गुंतवणुकदारांची फसवणुक
शेअरमार्केट गुंतवणुकीसाठी घेतलेल्या 70 लाखांचा अपहार करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – चांगला परताव्याचे गाजर दाखवून एका व्यावसायिकासह त्यांच्या परिचित आठ गुंतवणुकदारांची एका जोडप्याने आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आलाद आहे. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे 70 लाखांचा अपहार करुन संबंधित जोडपे फरार झाले असून या जोडप्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धवल विमलकांत कक्कड आणि संजना धवल कक्कड अशी या दोघांची नावे असून पळून गेलेल्या या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
योगेश केमजी भानुशाली हे व्यावसायिक असून साकिनाका परिसरात राहतात. त्यांचा शूज विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा धवल कक्कड हा परिचित मित्र असून तो पूर्वी एका खाजगी बँकेत कामाला होता. यावेळी त्याने त्यांना तो शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचे काम करत असून त्यांनी आतापर्यंत अनेकांचे शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करुन त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे असे सांगितले होते. धवलसह त्याची पत्नी संजना यांनी त्यांना त्यांच्यासह इतरांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून योगेश भानुशालीने त्यांच्या परिचित मित्र रमेश वेरशी डाघा, जयेश हरिश सांडा, विनोद विरजी मंगे, गणेश करमन मोर, रवी रमेश डाघा, मनिष नवीनमंगे, सुरेश एन. भानुशाली, जयेश एन. भानुशाली यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.
धवल व त्याची पत्नी संजना ही त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळून देईल असे सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे योगेशसह इतर आठजणांनी त्यांच्याकडे टप्याटप्याने 1 कोटी 20 लाख 15 हजार 402 रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यापैकी 49 लाख 28 हजार 787 रुपये त्यांना परत केले होते. मात्र उर्वरित 70 लाख 86 हजार 615 रुपयांचा परस्पर अपहार करुन या आरोपी पती-पत्नीने अपहार करुन संबंधित आठही गुंतवणुकदारांची फसवणुक केली होती. त्यांना कुठलाही परतावा तसेच मूळ न देता ते दोघेही पळून गेले होते. यावेळी त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच योगेश भानुशाली यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार कक्कड दाम्त्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धवल आणि त्याची पत्नी संजना कक्कड यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी शेअरमार्केटच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.