अठरा वर्षांच्या प्रेयसीची अल्पवयीन प्रियकराकडून हत्या

क्षुल्लक वादातून टेरेसवरुन धक्का दिल्याचे तपासात उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अठरा वर्षांच्या प्रेयसीची तिच्याच सोळा वर्षांच्या अल्पवयीन प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कशिश राकेश कसबे ऊर्फ कशिश अकबर शेख असे या हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला शिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

भारती राकेश कसबे ऊर्फ यास्मिन अकबर शेख ही महिला शिवडीतील ब्रिक बंदर झोपडपट्टीत राहते. तिला कशीश नावाची एक १८ वर्षांची मुलगी असून तिचे एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाशी प्रेमसंबंध होते. गेल्या चार दिवसांपासून ती त्याच्यासोबत शिवडीतील टाटा मैदानाजवळील एका पडक्या इमारतीमध्ये राहत होती. रविवारी ती जेवण करुन तिच्या प्रियकरासोबत तिथे झोपण्यासाठी गेली होती. मंगळवारी सकाळी ती इमारतीच्या तळमजल्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती शिवडी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेत कशिशला जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता.

याच गुन्ह्यांत तिच्या सोळा वर्षांच्या अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत रात्री उशिरा या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यातून त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्यानेच कशिशलला इमारतीच्या टेरेसवरुन धक्का दिला होता. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाला होती. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्याच्या कबुलीनंतर शिवडी पोलिसांनी अल्पवयीन प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. अठरा वर्षांच्या प्रेयसीची तिच्याच अल्पवयीन प्रियकराने हत्या केल्याच्या वृत्ताने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page