छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल

जोगेश्‍वरीतील २० वर्षांच्या भाजी विक्रेत्याला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० फेब्रुवारी २०२४

मुंबई, – आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूरासह व्हिडीओ व्हायल करुन धार्मिक भडकाविल्याप्रकरणी मोहम्मद इस्माईल मोहम्मद इसाईल शेख या २० वर्षांच्या भाजी विक्रेत्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वृत्ताला सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर यांनी दुजोरा दिला आहे. शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणे मोहम्मद इस्माईलला चांगलेच महागात पडले आहे.

शाम श्रवणकुमार मिश्रा हा तरुण जोगेश्‍वरी येथे राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने शहरात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी सव्वातीन वाजता शामला इंटाग्रामचवर मोहम्मद इस्माईल शेख याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याचे दिसून आला. त्यात त्याने शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला होता. त्यानंतर त्याने ही माहिती त्याच्या मित्रांना दिली. ते सर्वजण रात्री नऊ वाजता ओशिवरा पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना त्यांनी हा व्हिडीओ दाखवून मोहम्मद इस्माईल शेखविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. त्याची माहिती काढताना मोहम्मद इस्माईल हा जोगेश्‍वरीतील गुलशन नगर परिसरात राहत असून शुक्ला कंपाऊंडमध्ये भाजी विक्रीचे काम करत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ओशिवरा पोलिसांनी जोगेश्‍वरी येथून मोहम्मद इस्माईला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच इंटाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ अपलोड केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने पोलिसांकडे माफी मागून तो पुन्हा अशा प्रकारे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार नाही असे सांगितले. याप्रकरणी शाम मिश्रा याच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी मोहम्मद इस्माईलविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन धार्मिक भावना भडकाविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page