नमो चषक स्पर्धेत डीएलसीएफची बाजी
चषक एमएचबी पोलीस ठाणे संघाला समर्पित
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दहिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक स्पर्धेत डीएलसीएफ संघाने बाजी मारली. या संघाने चषक एमएचबी पोलीस ठाण्याला समर्पित करुन एक आदर्श दाखवून दिला. मुंबईमधील सर्वात पहिली नमो चषक स्पर्षा अलीकडेच दहिसर विभानसभा मतदारसंघात पाड पडली. यावेळी रितीक सिंग यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या दिनेश लाड किक्रेट फाऊंडेशन (डीएलसीएफ) संघाने या स्पर्धेचे विजेतेप आपल्या नावावर केले. डीएलसीएफ संघाला तब्बल २१ हजार रुपये आणि भव्यदिव्य चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सत्तरहून अधिक संघानी सहभाग घेतला होता. त्यातील एक संघ एमएचबी पोलीस ठाण्याचा होता. या संघाने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्व क्रिडा रसिकांना अक्षरशा मंत्रमुग्ध करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मारली. उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणी एमएचबी पोलीस ठाण्याचा संघ काहीसा मागे पडला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आयुषयात पहिल्यांदाच पोलिसांनी मौजमजा करताना पाहतोय हे पाहून सर्वांच्या मनाला एक वेगळा आनंद झाला. म्हटलं जात माणूस उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होता गर्दीतला. हो अगदी खरं आहे. त्यांच्यासारखे रक्षक दिवसरात्र रावत असतात म्हणून आपण सुखाने जीवन जगत असतो या उद्देशाने आपल्या डीएलसीएफ संघाने हा विजय झालेला चषक आपल्या फाऊंनडेशनचे सर्वेसर्वा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य सर दिनेश लाड यांच्या हस्ते एमएचबी पोलीस ठाण्याच्या संघाला समर्पित केला. तसेच डीएलसीएफसंघाला स्वत सरांनी आपल्या माध्यमातून तब्बल पाच हजार घोषित केले.