मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका एसआरए प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी बतावणी एका 58 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच रियल इस्टेट व्यावसायिक मित्राने सुमारे दहा लाखांची फसवणुक केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आहे. याप्रकरणी राजेंद्र जयंतीलाल मेहता या व्यावसायिक मित्राविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
बिरेन चेतन शहा हे गावदेवी परिसरात राहत असून वांद्रे येथील बीकेसी परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. राजेंद्र हा त्यांच्या परिचित असून त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहे. त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत बिरेन शहा हे त्यांच्या कार्यालयात होता. यावेळी त्यांना राजेंद्रचा कॉल आला होता. बोरिवली येथे साईदिप इंटरप्रायझेज कंपनीचा सर्वपाडा साईदिप नावाचा एक एसआरए प्रोजेक्ट सुरु आहे. या प्रोजेक्टसाठी काही गुंतवणुकदारांची गरज आहे. त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना त्यांचा फायदा होईल असे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी संबंधित प्रोजेक्टची सविस्तर माहिती पाठविली होती. त्यानंतर तो स्वत त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने पुन्हा प्रोजेक्टची माहिती सांगून त्यांना तिथे गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता.
राजेंद्रसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी त्याला गुंतवणुकीसाठी दहा लाख रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांनी राजेंद्रकडे प्रोजेक्टच्या कामाविषयी चर्चा केली असता त्याने अद्याप प्रोजेक्ट सुरु झाला नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे गुंतव.णुक केलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे परत केले नाही. तरीही त्यांनी त्यांच्या पैशांसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना तीन लाखांचा एक धनादेश दिला, मात्र हा धनादेश व वटता परत आला होता.
याबाबत विचारणा केल्यानंतर राजेंद्र विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी राजेंद्र मेहताविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. एसआरए प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून राजेंद्रने अशाच प्रकारे इतर काही लोकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.