निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर २८ एसीपींच्या बदल्या

बदल्यांमध्ये मुंबईतील सतरा पोलीस अधिकार्‍यांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर गृहविभागाने राज्य पोलीस दलातील २८ सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलातील सतरा पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. या बदल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी जारी केले. बदली झालेल्या ठिकाणी संबंधित अधिकार्‍यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निवडणुक अधिकार्‍यांनी दिले होते. या आदेशानंतर राज्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बुधवारी सायंकाळी गृहविभागाचे राज्य पोलीस दलातील २८ सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे आदेश जारी केले आहे. त्यात सतरा सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईचे आहेत. नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश अशोकराव गावडे यांची मुंबई, दहिसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर विश्‍वनाथ गायके यांची नवी मुंबई, खेरवाडी विभागाचे सुहास पांडुरंग कांबळे यांची नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच पोलीस उपअधिक्षक, मुलुंड विभागाचे रविंद्र शंकरराव दळवी यांची मरोळ, पोलीस प्रशिक्षण विभागाच्या पोलीस उपअधिक्षक, देवनार विभागाचे संजय दामोदर डहाके यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस उपअधिक्षक, सांताक्रुज विभागाचे महेश नारायण मुगुटराव यांची नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधिक्षक, भोईवाडा विभागाच्या कुमुद जगन्नाथ कदम यांची नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस उपअधिक्षक, वरळी विभागाचे अविनाश प्रल्हाद पालवे यांची पुणे महामार्ग पथकाच्या पोलीस उपअधिक्षक, पायधुनी विभागाच्या ज्योत्सना रासम यांची रायगडच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक, साकिनाका विभागाचे सूर्यकांत गणपत बांगर यांची छत्रपती संभाजीनगर मनमाड लोहमार्ग उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे महामार्ग सुरक्षा पथकाचे गजानन बाळासाहेब टोम्पे यांची रायगड पेण उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, माटुंगा विभागाचे मृत्यूंजय धनजय हिरेमठ यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक, चेंबूर विभागाच्या रेणुका शुभराज बुवा होनप यांची नाशिकच्या विशेष महानिरीक्षकाचे वाचक, दादर विभागाचे शशिकांत शंकर माने यांची नवी मुंबईतील कोकण भवन, गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक, खंडाळा पोलीस प्रशिक्षण विभाागच्या प्रेरणा कट्टे, मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भानुदास विश्‍वनाथ खटावकर, नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपअधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, मनमाड लोहमार्ग उपविभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती शंकर पंडित, नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रदीप भिवसेन मैराळे, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे विजय चिंतामण डोळस, रायगड महामार्ग सुरक्षा पथकाचे धनश्याम विजय पलंगे, कोल्हापूर मुख्यालयाचे प्रिया नानासाहेब पाटील, नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संदीप दौलत मोरे, नवी मुंबईतील कोकन भवन, गुन्हे अन्वेषण विभागाचे तन्वीर अहमद अब्दुल समद शेख, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक रामराव त्र्यंबक ढिकले यांची यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली तर आग्रीपाडा विभागाचे राजू लक्ष्मण कसबे, विक्रोळी विभागचे दिनकर गंगाधर शिलवटे यांची स्वतंत्र बदलीचे ठिकाण दाखविण्यात येणार असल्याचे सांगणयत आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page