मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – विदेशात विविध नामांकित कंपनीत चांगल्या पगाराचे गाजर दाखवून पाठविलेल्या बेरोजगार तरुणांना सायबर गुलाम बनविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होताच राज्य सायबर सेल पोलिसांनी विदेशात नोकरीसाठी पाठविणार्या सराईत टोळीचा पर्दाफाश करुन साठ सायबर गुलामाची सुटका केली आहे. याप्रकणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे. मनिष ग्रे ऊर्फ मँडी, आदित्य रवी चंद्रन, रुपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी आणि तलानिती नुसाक्सी नायजीज अशी या पाचजणांची नावे असून यातील तलानिती हा कझाकस्तानी नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत सोशल मिडीयावर विशेषता फेसबुक, इंटाग्राम आदींवर विदेशात नामांकित कंपनीत विविध पदावर चांगल्या पगाराची नोकरी असल्याची बतावणी करुन जाहिरात देण्यात आली होती. विदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या अनेक बेरोजगारांनी ही जाहिरात पाहून तिथे नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर संबंधित तरुणांची मुलाखत घेण्यात आली होती. चांगले संभाषण कौशल्य असेल्या तरुणांची निवड करुन त्यांचे पासपोर्ट घेतले जात होते. त्यांना व्हिसा आणि विमान तिकिट देऊन सुरुवातीला टुरिस्ट व्हिसावर विदेशात पाठविले जात होते. या बेरोजगार तरुणांसोबत संबंधित टोळीचे काही एजंटही जात होते. त्यामुळे या तरुणांवर त्यांच्यावर विश्वास बसत होता. त्यानंतर या तरुणांना थायलंड येथे नेण्यात आले होते. नंतर त्यांना थायलंड-म्यानमार सीमेच्या दिशेने सात ते आठ आठ प्रवास करुन एका ठिकाणी आणले जात होते.
म्यारमारमध्ये प्रवेश करुन या बेरोजगार तरुणांना एका बोटीतून नदी ओलाडून सशस्त्र बंडखोर गटाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मायावाडी परिसरातून आणून तिथे त्यांचे पासपोर्ट जप्त केले जात होते. त्यानंतर त्यांच्यासोबत एक वर्षांचा करार करुन त्यांना सायबर फसवणुक करणार्या कंपनीत नोकरी दिली जात होती. तिथे त्यांना सायबर गुलाम बनविले जात होते. या तरुणांना ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे काम सोपविले जात होते. त्यांच्याकडून शेअर ट्रेडिंग, गुंतवणुक टास्क, डिजीटल अरेस्ट अशा वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांची काम करुन घेतली जात होती. काम करण्यास नकार देणार्या तरुणांचा प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण केले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीरातील अवयव काढून त्याची विक्री करण्याची धमकी दिली जात होती. या ठिकाणी सशस्त्र बंडखोर तैनात असल्याने तिथे कोणालाही पळून जाता येत नव्हते. तसा प्रयत्न झाल्यास संबंधित तरुणांवर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केले जात होते. स्वतची सुटका करण्यासाठी या तरुणांकडून एक वर्षांनी पाच हजार डॉलर्स घेतले जात होते.
अशा प्रकारे या एजंटांनी अनेकांना नोकरीसाठी विदेशात आणून तिथे त्यांना सायबर गुलाम बनवून नंतर सुटका करण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये डॉलर्स स्वरुपात घेतले होते. याच दरम्यान काही तरुणांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांच्याबाबतीत घडलेला प्रकार सांगून त्यांची सुटका करण्याची विनंती केली होती. त्यामुळे या तरुणांच्या पालकांनी संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त होताच त्याची महाराष्ट्र सायबर सेलने गंभीर दखल घेतली होती. केंद्र सरकारच्या मदतीने सायबर सेल पोलिसांनी संबंधित तरुणांच्या सुटकेसाठी विशेष ऑपरेशन सुरु केले होते. त्यात या अधिकार्यांना यश आले आहे. केंद्र सरकारने म्यानमार सरकारशी संपर्क साधून नोकरीसाठी गेलेल्या साठहून अधिक बेरोजगार तरुणांची संबंधित ठिकाणातून सुटका करुन त्यांना पुन्हा भारतात आणले होते.
सुटका केलेल्या तरुणांची जबानी नोंदवून घेतल्यानंतर त्यांना आलेल्या अनुभवाचा धक्कादायक माहितीने पोलिसांना धक्का बसला होता. त्यामुळे या तरुणांना विदेशात नोकरीच्या आमिषाने सायबर गुलाम बनविणार्या आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत एका विदेशी नागरिकासह चार भारतीय आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली.
अशा प्रकारे नोकरीच्या आमिषाने फसवणुक करणारी ही एक सराईत टोळीच असून या टोळीचा म्होरक्या मनिष ग्रे ऊर्फ मँडी आहे. तो अभिनेता असून त्याने काही वेबमालिका आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले होते. विदेशात नोकरीसाठी जाहिरात देणे, तरुणांची निवड करणे, त्यांन म्यानमारला पाठविणे आदी सर्व कामाची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याला इतर आरोपी मदत करत होते. ही टोळी मलेशिया, थायलंड, म्यानमारसह भारतातील अनेक ठिकाणी बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी पाठविते.तलनिती हा विदेशी नागरिक असून अलीकडेच तो नवीन भरतीकामी भारतात आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली.