राज्य पोलीस दलातील 21 उपायुक्ताच्या बदल्या

तीन पोलीस उपायुक्तांची मुंबई शहरात बदली

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2025
मुंबई, – राज्य पोलीस दलातील 21 पोलीस उपायुक्त व पोलीस अधिक्षकांच्या गुरुवारी गृहविभागाने बदल्या केल्या. त्यात अहिल्यानंतरच्या राकेश ओला, कायदा व सुव्यवस्थेचे राजतिलक रोशन आणि सातराचे समीर अस्लम शेख यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली आहे.

गृहविभागाचे सहसचिव व्यकंटेश भट यांनी गुरुवारी राज्य पोलीस दलातील 21 पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात अहिल्यानंतरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची मुंबई शहर, रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर, पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बाचे समादेशक आंचल दलाल यांची रायगड, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर, अकोलाचे पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची नागपूरच्या राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक, नांदेडचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक कोल्हापूर, नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची अकोला,

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग, कायदा व सुव्यवस्थेचे सहाय्यक पोलीस महनिरीक्षक राजतिलक रोशन यांची मुंबई, पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीण, गडचिरोली अभियानचे अप्पर पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांची पालघर, सिंधुदुर्गचे पोलीस अधिक्षक सौरभ अगरवाल यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग, ठाण्याचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग, बुलढाणा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांची अमरावती राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक, नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांची बुलढाणा,

सातारा पोलीस अधिक्षक समीर अस्लम शेख यांची मुंबई शहर, पुणे लोहमार्गचे पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांची सातारा, लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय विनायक मुंडे यांची छत्रपती संभाजीनगर परिमंडळ एक, पुणे एटीएसच्या पोलीस अधिक्षक जयंत मीना यांची लातूर, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांची रत्नागिरी आणि सांगलीच्या अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोकर यांची धारावीव येथे पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page