हिरा-पन्ना शॉपिंग सेंटरच्या स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मॅनेजर-कॅशिअरला अटक तर चार महिलांची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – ताडदेवच्या हिरा-पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या तंत्र लक्झरी स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाचा मॅनेजर मॅनेजर जमीर अमीर तांबोळी आणि कॅशिअर सीमादेवी या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. तसेच स्पामध्ये तीन ग्राहक मिळून आले, त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.
ताडदेव येथील हाजीअली, भुलाभाई रोड, हिरा-पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये तंत्र लक्झरी नावाचे एक स्पा आहे. या स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाने ग्राहकांकडून पैसे घेऊन तिथे कामाला असलेल्या महिला कर्मचार्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा केली होती. ठरल्याप्रमाणे हा बोगस ग्राहक स्पामध्ये गेला होता. बॉडी मसाजसोबत त्याने काही महिलांची शारीरिक संबंधासाठी मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे स्पाच्या मॅनेजरने त्याच्याकडे दोन हजाराची मागणी केली होती. त्याने दोन हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याला चार महिलांना दाखविण्यात आले. त्यापैकी त्याने एका महिलेची निवड केली होती.
याच दरम्यान या बोगस ग्राहकाकडून पोलिसांना सांकेतिक इशारा देण्यात आला होता. त्यानंतर या पोलीस पथकाने तिथे छापा टाकला होता. यावेळी स्पाचा मॅनेजर जमीर तांबोळी व कॅशिअर सीमादेवी या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना चार महिला सापडल्या. या चारही महिलांची चौकशी केल्यानंतर स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या जबानीनंतर संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत मॅनेजरसह कॅशिअर महिलेला पोलिसांनी अटक करुन त्यांना पुढील चौकशीसाठी ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन केले. अटकेनंतर त्यांना विशेष लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
या कारवाईत पोलिसांनी चार महिलांची सुटका करुन त्यांना मेडीकलसाठी पाठविले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. यावेळी स्पामध्ये तीन ग्राहक मिळून आले, त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 38 हजाराची कॅश, मोबाईलसह स्पाचे दस्तावेज व इतर साहित्य जप्त केले आहेत.