झारखंडी नक्षलीसह सहाजणांच्या टोळीला घातक शस्त्रांसह अटक

दरोड्यासाठी लागणार्‍या घातक शस्त्रांसह इतर मुद्देमाल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑक्टोंबर 2025
ठाणे, – मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून प्रसंगी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन लुटमार करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहाजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. राजेंद्र महेश यादव, मोहम्मद सर्फराज अब्दुल सत्तार अन्सारी, अब्दुल रहिम सलीम अन्सारी, सद्दाम अबुल अन्सारी, शिवकुमार चौठा उराव आणि अरविंद बाबूराम यादव अशी या सहाजणांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक बोलेरो कार, तीन देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, एक लोखंडी कटावणी, मिरचीची पूड, रस्सी आणि सहा मोबाईल हा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोड्याच्या तयारीत असताना या सहाजणांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या चौकशीतून मुंबईसह महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत ाअहे.

ठाण्यातील खारेगाव टोलनाक्याकडून कळवा बाजूकडे येणार्‍या मार्गावर काहीजण घातक शस्त्रांसह दरोड्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार संदीप भागरे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस हवालदार दिनेश कुंभारे, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, मंगेश साबळे, अनुप कामत, जयकर जाधव, राहुल शिरसाठ, पोलीस नाईक सचिन कोळी, तौसिक सैयद, पोलीस अंमलदार अशोक पाटील, महेश सावंत, चालक सदन मुळे, महिला पोलीस हवालदार आशा गोळे, महिला पोलीस नाईक गिताली पाटील यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

परिसरात गस्त घालताना टोल नाक्यापासून दोनशे मिटर अंतरावर पोलिसांना एक बेलोरो कारमधून सहाजण संशयास्पद फिरताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहताच ते सर्वजण पळू लागले, यावेळी पोलिसांनी कारचा पाठलाग करुन काही अंतर गेल्यानंतर कारला थांबवून सहाजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांची नावे राजेंद्र यादव, मोहम्मद सर्फराज, अब्दुल अन्सारी, सद्दाम अन्सारी, शिवकुमार उराव आणि अरविंद यादव असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण झारखंड आणि उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. कारच्या झडतीत पोलिसांना तीन अग्निशस्त्रे, चार जिवंत काडतुसासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य सापडले. चौकशीत ही टोळी तिथे दरोड्याच्या उद्देशाने आले होते.

नााशिक-मुंबई हायवेवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना थांबवून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन घातक शस्त्रांचा धाकावर लुटमार करणार होते. मात्र लुटमारीपूर्वीच या सहाजणांना पोलिसांनी अटक केली. या सहाजणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आले. यातील काही आरोपी झारखंडच्या नक्षलींशी संबंध असल्याचे बोलले जाते. ठाण्यात लुटमार करुन ते सर्वजण त्यांच्या गावी पळून जाणार होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना दुसर्‍या दिवशी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या सहाजणांची चौकशी सुरु असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page