सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीच्या दुकलीस अटक
52 गुन्ह्यांची उकल करुन 30 लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जानेवारी 2026
ठाणे, – मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कर्नाटक राज्यात सोनसाखळी चोरी करणार्या एका आंतरराज्य टोळीशी संबंधित दोन रेकॉर्डवरील आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. कासिम गरीबशहा इराणी आणि मुख्तार शेरु हुसैन ऊर्फ इराणी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कल्याणच्या आंबिवलीचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेने 52 हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या सर्वच युनिटला आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस अंमलदार प्रशांत वानखेडे आणि विनोद चन्ने यांनी गस्त घालताना संशयास्पद फिरणार्या कासिम इराणी आणि मुख्तार इराणी या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. यातील कासिमविरुद्ध खडकपाडा, एमएफसी, पिंपरी, गंगापूर, नाशिक, चिंचवड, कोथरुड, संगमनेर, कोतवाली, खदन, कर्जत पोलीस ठाण्यात वीस तर मुख्तार याच्याविरुद्ध कोळसेवाडी, मानपाडा, एमएफसी, नौपाडा, कळवा, वर्तकनगर, मुंब्रा पोलीस ठाण्यात चौदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने 52 हून अधिक सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली.
त्यात कळवा, खडकपाडा, कामोठे, सानपाडा, हिललाईन, अंबरनाथ, कापूरबावडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, कोळशेवाडी पोलीस ठाण्यातील सहा, डोंबिवली, खांदेश्वर, कळवा, महात्मा फुले चौक, सीबीडी, नेरुळ, रबाळे, साकिनाका, आरे कॉलनी, धारावी, दिडोंशी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, खारघर, बदलापूर, नारपोली, पनवेल पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन तसेच कर्नाटकच्या बदामी पोलीस ठाण्यातील चार, आदर्शनगर पोलीस ठाण्यातील तीन, अफजलपूर, आदर्शनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या 52 गुन्ह्यांतील तीस लाख सहा हजार सातशेपन्नास रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, कल्याण गुन्हे शाखेचे अजीत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, बोरकर, पोलीस हवालदार प्रशांत वानखेडे, सुधीर कदम, विजय जिरे, आदिक जाधव, विलास कडू, गोरखनाथ पोटे, भांगरे, खंडारे, सचिन कदम, सचिन भालेराव, पोलीस नाईक दिपक महाजन, प्रविण किनरे, पोलीस शिपाई विनोद चन्ने, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, सतीश सोनावणे, गोरक्ष शेकडे, गणेश हरणे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित यांनी केली.