ठाण्यात महाराष्ट्रातील पहिले सायबर वेलनेस कक्ष कार्यान्वित
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
ठाणे, – ठाण्यातील महाराष्ट्रातील पहिले सायबर वेलनेस कक्ष कार्यान्वित झाले असून या कक्षेचे गुरुवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पेतून साकार झालेल्या या सायबर वेलनेस कक्षाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून आगामी काळात इतर शहरात अशा प्रकारच्या सायबर वेलनेस कक्षेचा स्थापना होणार असल्याचे बोलले जाते.
्अलीकडेच्या काळात सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी विशेष प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्याच संकल्पेतून ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात होणार्या सायबर गुन्ह्यांच्या तपासकामी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेलची स्थापना करण्यात आली होती. या गुन्ह्यांचा तपासासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तंज्ञ सायबर अधिकार्यांची आवश्यकता असल्याची बाब लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सायबर तंज्ञांची नेमणूक केली होती.
अनेकदा सायबर गुन्ह्यांचा तपासात गुन्ह्यांतील रक्कमेचा क्रिप्टो करन्सीच्या माध्मयातून अपहार होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांसाठी प्रथमच सायबर पोलीस ठाणे येथे क्रिप्टो करन्सी अन्वेषणण कक्षाची 24 सप्टेंबर 2025 रोजी स्थापना करण्यात आली आहे. त्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांतील बळीतांची मोठ्या रक्कमेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणुक होत असल्याने रिस्पॉन्सीबल नेटीझम व ठाणे जनता सहकारी बँक यांच्या सहकार्याने पोलीस आयुक्त कार्यालयात प्रथमच सायबर वेलनेस सेंटर सुरु करण्यात आले आहे. या कक्षामध्ये सायबर गुन्ह्यांत बळी पडलेल्या पिडीतांना मानसिक, तांत्रिक आणि कायदेशीर समुपदेशन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयातील शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, पराग मणेरे, सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सोनाली पाटकर, रिस्पॉन्सीबल नेटीझमचे सीओओ उन्मेश जोशी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक अभिजीत पानसे, विजू माने, ठाणे जनता सहकारी बँकेचे अधिकारी, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके, इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पतेतून ठाण्यातील महाराष्ट्रातील पहिलेच सायबर वेलनेस कक्ष आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.