शहरात तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तिघांचा मृत्यू

आरोपी तिन्ही चालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आमीर जहीर सय्यद, खेताराम भगाजी चौधरी आणि तिम्माप्पा शांताराज यांचा समावेश आहे. याप्रकरणी बीकेसी, बांगुरनगर आणि आंबोली पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. यातील एका अपघाताला खेताराम हाच जबाबदार होता तर इतर दोन अपघाताील आरोपी चालक मोहम्मदअली सईद शेख आणि जहाँगीर मिराज एसके यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती.

पहिला अपघात सोमवारी रात्री सव्वादहा वाजता वांद्रे येथील बीकेसी, फॅमिली कोर्टजवळील कलानगर ब्रिजवर झाला. सोहेल जहीर सय्यद हा तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहत असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मृत आमीर हा त्याचा लहान भाऊ आहे. सोमवारी रात्री आठ वाजता आमीर हा नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला गेला होता. रात्री साडेआठ वाजता आमीर त्याचे दोन मित्र जिशान उस्मान खान आणि मोहम्मदअली सईद शेख यांच्यासोबत स्कूटीवरुन ट्रिपल सीटने माहीम दर्गा येथे गेले होते.

रात्री साडेनऊ वाजता ते तिघेही माहीम दर्गा येथून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मोहम्मदअली स्कूटी चालवत होता तर त्याच्या मागे जिशान आणि आमीर बसले होते. ही स्कूटी कलानगर ब्रिजवर जात असताना स्कूटी स्पीड ब्रेकरवर आदळल्याने मोहम्मदअलीने अचानक ब्रेक लावला. त्यात स्कूटी स्लीप होऊन ते तिघेही जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी आमीरची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सोहेल सय्यदच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आमीरचा मित्र आणि स्कूटीचालक मोहम्मदअली सईद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

दुसरा अपघात मंगळवारी 2 डिसेंबरला सकाळी आठ वाजता जोगेश्वरीतील ओशिवरा, बाळासाहेब देवरस मार्ग, ओशिवरा आशियाना सोसायटीच्या गेटसमोर झाला. मंगळवारी सकाळी आंबोली पोलिसांचे एक पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी ओशिवरा आशियाना सोसायटीच्या गेटसमोर एक अपघात झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस पथक तिथे गेले होते. घटनास्थळी पोलिसांना एक बाईकस्वार अपघातात जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला मृत घोषित करण्यात ाअले. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रावरुन त्याची ओळख पटली होती.

मृत व्यक्तीचे नाव तिम्माप्पा शांताराज असून तो धारावीतील जाम्बा पास्कल चाळीचा रहिवाशी होता. मंगळवारी सकाळी तो त्याच्या बाईकवरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका टॅकरने धडक दिली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या टँकरचालक जहाँगीर एसके याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने टँकर चालवून एका बाईकस्वाराच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

तिसरा अपघात मालाड येथील मिठ चौकी, मालवणीकडून मालाडकडे ाजणार्‍या उड्डाणपुलावर झाला. सीता खेताराम चौधरी ही महिला मालाड येथे राहत असून मृत खेताराम चौधरी हा तिचा पती आहे. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. मालवणी येथे ज्वेलरीसाठी कच्चा माल मिधळत असल्याने खेताराम हे अधूनमधून मालवणीला कच्चा माल आणण्यासाठी जात होते. 7 नोव्हेंबरला ते मालवणी येथे गेले होते. यावेळी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

तपासात खेताराम हे त्यांच्या बाईकवरुन मालवणीकडून मालाडच्या दिशेने जात असताना मिठ चौकीजवळील उड्डानपुलावर भरवेगात जात होते. यावेळी त्यांचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला तेच जबाबदार असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेताराम यांच्यावर राजस्थान येथे अंत्यविधी करण्यात आला होता. अंत्यविधीनंतर त्यांची पत्नी सीता चौधरी ही मुंबईत आली होती. यावेळी तिची पोलिसंनी जबानी नोंदवून घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page